Former Team Indian player Jatin Paranjape: ‘नशीब; आपल्याला दुसरी संधी देखील देते. असाच काहीसा प्रकार माजी क्रिकेटपटू जतीन परांजपे यांच्याबाबत घडला. वास्तविक जतीन परांजपे भारतासाठी फक्त ४ वनडे खेळू शकले, पण त्यानंतरही त्यांच्या नशिबाने त्यांना दुसरी संधी दिली आणि आज हा ‘फ्लॉप क्रिकेटर’ करोडपती झाला आहे. १९७२ साली जन्मलेले परांजपे महान फलंदाज सचिन तेंडुलकरसोबत खेळून मोठे झाले.

सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे त्यांनी सचिनला मागे टाकून मुंबई क्रिकेट असोसिएशनचा १९८६-८७ सालचा ‘ज्युनियर क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार जिंकण्यात तो यशस्वी झाला. जतीनच्या रणजी ट्रॉफी कारकिर्दीची सुरुवात १९९१-92 हंगामात झाली. यानंतर, ६ वर्षांनी, त्याने १९९८ मध्ये भारतासाठी पदार्पण केले. जतीन परांजपे त्याच्या एका खेळीसाठी लक्षात राहतात. कॅनडा येथे झालेल्या सहारा चषकात त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात २३ धावांची नाबाद खेळी खेळली आणि भारताला विजय मिळवून दिला. मात्र यानंतर परांजपे यांना भारतीय संघात संधी मिळू शकली नाही.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर

टाचेच्या दुखापतीमुळे जतीन परांजपे पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळू शकला नाही

टाचेच्या दुखापतीमुळे जतीन परांजपे याची कारकीर्द अकालीच संपुष्टात आली, जतिनने शेवटचा वन डे सामना १९९८ मध्ये पाकिस्तानविरुद्ध टोरंटो येथे खेळला होता. त्याच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात त्याला फक्त एक धाव करता आली. जतीनला भारताकडून कसोटी सामन्यात पदार्पण करता आले नाही.

प्रथम श्रेणी क्रिकेट कारकीर्द

जतीन परांजपे याने त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत ६२ सामने खेळले आणि त्यादरम्यान त्यांनी ३९६४ धावा केल्या. त्याच्या फर्स्ट क्लास कारकिर्दीत १३ शतके आणि १५ अर्धशतके होती. त्याच्या या यादीत त्याने ४४ सामने खेळले आणि त्यात १०४० धावा केल्या. त्याच्या नावावर ‘लिस्ट ए’ क्रिकेट करिअरमध्ये २ शतके आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे.

क्रिकेटपासून दूर गेल्यानंतर आता जतीन परांजपे उद्योगपती झाला

क्रिकेटपटू म्हणून आपली कारकीर्द वेळेत पूर्ण करू शकला नाही. क्रिकेटपासून दूर गेल्यानंतर जतीन व्यवसायाकडे वळला. त्याच्यात त्याला मोठे यश मिळाले. त्यानंतर काही वर्षांनी त्याने तयार केलेल्या स्पोर्ट्स वन इंडियाला भरपूर यश मिळाले. त्याच्या व्यवसायात सर्वात मोठे वळण तेव्हा आले जेव्हा त्याने एका अभिनेत्रीच्या बहिणीशी विवाह केला आणि त्यानंतर तिंला आपल्या व्यवसायात सामील करून युरोपला पाठवले. तिथूनच व्यवसायाच्या युक्त्या शिकून परांजपे यांनी २०१७ मध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून ‘खेलो मोर’ (Khelo More)ची स्थापना केली.

हेही वाचा: Ishant Sharma: “माही रागात खूप शिव्या द्यायचा…” धोनीच्या ‘कॅप्टन कूल’ टॅगवर इशांत शर्माचा मोठा खुलासा

परांजपे यांचे लग्न बॉलीवूड स्टार सोनाली बेंद्रेची बहीण गांधालीशी झाले आहे

माजी क्रिकेटपटू परांजपे याच्या मुंबईस्थित स्टार्टअपमध्ये ड्रीम ११ आणि अश्विन डमेरासारखे गुंतवणूकदार आहेत. माजी क्रिकेटर परांजपेने बॉलिवूड स्टार सोनाली बेंद्रेची बहीण गांधालीशी लग्न केले आहे. त्याने बीसीसीआयचा निवडकर्ता म्हणूनही काम केले आहे.