पाकिस्तानपेक्षा अधिक प्रेम आम्ही भारतात अनुभवतो, ही कर्णधार शाहिद आफ्रिदीची प्रतिक्रिया धक्कादायक आणि भावना दुखावणारी आहे. त्यामुळे खेळाडूंची अशा प्रकारची वक्तव्ये ही शरम वाटावी अशी आहेत, अशा शब्दांत पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनी संताप व्यक्त केला आहे.
ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतात पोहोचल्यावर आफ्रिदी आणि अनुभवी खेळाडू शोएब मलिक यांनी भारतावर स्तुतिसुमनांचा वर्षांव केला. भारतात खेळताना आम्हाला कधीच भीती वाटली नाही. फक्त सुरक्षेच्या चिंतेमुळे भारतात येण्यास विलंब झाला, अशी ग्वाही या दोघांनी प्रसारमाध्यमांसमोर दिली होती.
‘‘भारतात खेळताना आम्हाला नेहमीच आनंद वाटतो, कारण पाकिस्तानपेक्षा भारतातील चाहत्यांकडून आम्हाला अधिक प्रमाणात प्रेम मिळाले आहे,’’ असे आफ्रिदीने रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. यावर एका टेलिव्हिजन वाहिनीवर भाष्य करताना मियाँदाद म्हणाला, ‘‘ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळण्यासाठी पाकिस्तान भारतात गेला आहे. याचा अर्थ असा नव्हे, की खेळाडूंनी यजमानांचे गुणगान गायला हवे.’’
‘‘गेल्या पाच वर्षांत भारताने आपल्याला किंवा पाकिस्तानच्या क्रिकेटला काय दिले आहे? हे सत्य भारतात सांगावे. पाकिस्तान क्रिकेटची अनेक वष्रे सेवा करताना आपल्या खेळाडूंच्या वक्तव्यांनी मी दुखावलो आहे,’’ असे मियाँदाद म्हणाला.
पाकिस्तानचे माजी कसोटीपटू मोहसिन खान यांनीही दोघांच्या वक्तव्यांबाबत आश्चर्य प्रकट केले. ‘‘आफ्रिदी आणि मलिक हे दोघेही संघातील अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे विशेषत: भारतात असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काळजी घ्यायला हवी,’’ असे खान यांनी सांगितले.
आफ्रिदीच्या वक्तव्याची शरम वाटते -मियाँदाद
पाकिस्तानपेक्षा अधिक प्रेम आम्ही भारतात अनुभवतो, ही कर्णधार शाहिद आफ्रिदीची प्रतिक्रिया धक्कादायक आणि भावना दुखावणारी आहे. त्यामुळे खेळाडूंची अशा प्रकारची वक्तव्ये ही शरम वाटावी अशी आहेत, अशा शब्दांत पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनी संताप व्यक्त केला आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतात पोहोचल्यावर आफ्रिदी आणि अनुभवी खेळाडू शोएब मलिक यांनी भारतावर स्तुतिसुमनांचा वर्षांव केला. भारतात खेळताना […]
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-03-2016 at 02:27 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Javed miandad hits out at shahid afridi