Javed Miandad’s reaction to ODI World Cup 2023: पाकिस्तानचा माजी फलंदाज जावेद मियांदादने पुन्हा एकदा भारताविरुद्ध गरळ ओकली आहे. त्याच्या मते जोपर्यंत भारताचा संघ पाकिस्तानमध्ये खेळायला येत नाही, तोपर्यंत पाकिस्तानने यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आणि इतर सामन्यांसाठी भारतात जाऊ नये. तो म्हणाला, पाकिस्तानच्या संघाला भारतात खेळायला न गेल्याने कोणताही फरक पडणार नाही. आता भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये येण्याची पाळी आहे.

आयसीसीने तयार केलेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेच्या मसुद्यानुसार, अहमदाबादमध्ये १५ ऑक्टोबरला भारत-पाक हाय-व्होल्टेज सामना होणार आहे. तथापि, ६६ वर्षीय पाकिस्तानचा माजी कर्णधाराचे म्हणने आहे की, आता भारताची पाकिस्तान दौऱ्याची पाळी आहे. मियांदाद म्हणाला, “पाकिस्तानचा संघ २०१२ आणि २०१६ मध्येही भारतात गेला होता. आता येथे येण्याची पाळी भारतीय संघाची आहे. जर निर्णय घेणे माझ्या हातात असते, तर मी भारतात कधीही कोणताही सामना खेळायला गेलो नसतो, अगदी विश्वचषकही नाही.आम्ही त्यांच्याशी (भारत) खेळण्यासाठी नेहमीच तयार असतो, परंतु ते कधीही तशाच प्रकारे प्रतिसाद देत नाहीत.”

uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Virat Kohli Didnt Liked Ambati Rayudu Robin Uthappa Reveals 2019 World Cup Team Selection
Robin Uthappa on Virat Kohli: “विराटला तो आवडत नव्हता”, स्फोटक फलंदाजाला २०१९ च्या वर्ल्डकप संघातून वगळण्याबाबत रॉबिन उथप्पाचा मोठा खुलासा
Chhagan Bhujbal Uday Samant
लाडक्या बहिणींना भुजबळांचा इशारा; योजना बंद होणार? उदय सामंत म्हणाले, “आम्हाला सत्तेपर्यंत…”
भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?
security beefed up around z morh tunnel
‘झेड मोढ’ बोगद्याभोवती सुरक्षा व्यवस्थेत वाढ; पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्या उद्घाटनाची शक्यता

भारतात न गेल्याने काही फरक पडणार नाही –

मियांदाद पुढे म्हणाला, “पाकिस्तान क्रिकेट मोठे आहे. आम्ही अजूनही दर्जेदार खेळाडू तयार करत आहोत. त्यामुळे आम्ही भारतात न गेल्याने आम्हाला काही फरक पडेल, असे मला वाटत नाही.” भारताने २००८ मध्ये ५० षटकांच्या आशिया चषकासाठी शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. तेव्हापासून दोन्ही देशांमधील तणावामुळे द्विपक्षीय क्रिकेट सामने होत नाहीत.

हेही वाचा – TNPL 2023: मुरुगन अश्विनने हवेत उडी मारून पकडला आश्चर्यकारक झेल, VIDEO होतोय व्हायरल

खेळांना राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे –

खेळांना राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे, असे मियांदादचे मत आहे. तो म्हणाला, “मी नेहमीच म्हणत आलो की, कोणीही आपला शेजारी निवडू शकत नाही. त्यामुळे एकमेकांना सहकार्य करणे चांगले. मी नेहमीच म्हणत आलो की क्रिकेट हा एक असा खेळ आहे, जो लोकांना जवळ आणतो. तसेच देशांमधील गैरसमज आणि तक्रारी दूर करू शकतो.”

आशिया चषकाच्या ‘हायब्रीड मॉडेल’वर मियांदादची प्रतिक्रिया –

मियांदादची प्रतिक्रिया अशा वेळी आली आहे, जेव्हा पाकिस्तानला ‘हायब्रीड मॉडेल’ अंतर्गत आगामी आशिया चषक आयोजित करण्यास भाग पाडले जात आहे. भारत आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे. भारतावर जोरदार टीका करणारा मियांदाद या निर्णयावर खूश नाही. तो म्हणाली, “आशिया चषकासाठी ते एकदाही आपला संघ पाकिस्तानला पाठवणार नाहीत, असा विश्वास होता. त्यामुळे आता आम्हीही कठोर भूमिका घेण्याची वेळ आली आहे.”

Story img Loader