पाकिस्तानी क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज उमर अकमल मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळल्या प्रकरणी त्याच्यावर सोमवारी बंदीची कारवाई करण्यात आली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या शिस्तपालन समितीचे प्रमुख फैजल इ मिरान चौहान यांनी त्याला तीन वर्षांच्या बंदीची शिक्षा ठोठवली. या काळात त्याला क्रिकेटशी संबंधित कोणत्याही गोष्टीत सहभागी होता येणार नाही. अकमलच्या विरोधात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची शिस्तपालन समिती तपास करत होती. या तपासाअंती त्याला मॅच फिक्सिंग प्रकरणी दोषी ठरवण्यात आले.
दुर्दैवी! करोनामुळे मूळ भारतीय असलेल्या ज्येष्ठ क्रीडापटूचे निधन
पाक क्रिकेट बोर्डाने उमर अकमलवर कारवाई केल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या. पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनीही आपले मत मांडले. “मी उमर अकमलला आधीच बजावलं होतं की आपल्या वाटेने चालत राहा. चुकीच्या गोष्टींमध्ये सहभागी होऊ नकोस. उमर अकमल हा अत्यंत प्रतिभावंत खेळाडू आहे, पण आता आपल्या हाती पश्चात्ताप करण्यावाचून काहीही नाही. देवाने त्याला सारं काही दिलं होतं, पण त्या सगळ्याची काळजी त्याला घेता आली नाही”, असे स्पष्ट मत मियाँदादने व्यक्त केले.
पाकिस्तानच्या उमर अकमलवरील बंदीबाबत हर्षा भोगले म्हणतात…
याशिवाय, प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनीही आपले मत व्यक्त केले. “मी पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत मी दोन अतिशय प्रतिभावान खेळाडू पाहिले. एक बांगलादेशचा मोहम्मद अशरफुल आणि दुसरा उमर अकमल. पण तुम्ही कोण आहात आणि तुम्ही तुमच्या प्रतिभेचा कशाप्रकारे वापर करता यावर तुमची कारकीर्द ठरते” असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.
विराटवर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही – डीव्हिलियर्स
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक यानेही अकमलवर बोचरी टीका केली. “आता उमर अकमल अखेर अधिकृतरित्या मुर्खांच्या यादीत सामील झाला. ३ वर्षांच्या बंदीची कारवाई. टॅलेंट पूर्णपणे वाया जात आहे. आता पाणी डोक्यावरून चाललं आहे. आता पाकिस्तानने संसदेत मॅच फिक्सिंग विरोधात कायदा करून दोषींना कारावासात पाठवायला हवे. अन्यथा असे लोक अजून वाढतील”, असे ट्विट करत त्याने मॅच फिक्सिंग करणाऱ्यांवर खरमरीत टीका केली.
सर्वोत्तम आजी-माजी फलंदाज कोण? वॉर्नर-विल्यमसन यांनी दिलं उत्तर
दरम्यान, अकमलने एका मुलाखतीत असे सांगितले होते की त्याला सामना सुरू असताना दोन वेळा चेंडू जाणूनबुजून सोडण्यासाठी २ लाख अमेरिकन डॉलर्स देण्याचे लालूच दाखवले होते. भारताविरूद्धच्या सामन्यातच त्याला चेंडू सोडण्यास सांगितल्याचेही त्याने मुलाखतीत स्पष्ट केले. २०१५ ला ऑस्ट्रेलियात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान त्याच्याशी फिक्सिंगसाठी संपर्क साधण्यात आला होता. पण त्याने ही बाब बोर्डाच्या अधिकाऱ्यांना सांगितली नव्हती, त्यामुळे त्याला दणका देण्यात आला आहे.