World Athletics Championships 2023: जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पहिल्यांदाच हजेरी लावणारा भालाफेकपटू किशोर जेनाने चांगली कामगिरी करत ही मालिका पाचव्या स्थानावर संपवली. किशोर जेना गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी तो तब्बल दोन वर्षे घरीच गेला नाही आणि नजीकच्या भविष्यातही तो घरी जाईल अशी कोणतीही शक्यता दिसत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने बुडापेस्ट येथील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला, तर जेना आणि डीपी मनूच्या कामगिरीनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रविवारी रात्री उशिरा झालेल्या अंतिम फेरीत जेनाने वैयक्तिक सर्वोत्तम ८४ मीटर लांब भालाफेक करत पाचवे स्थान पटकावले. ७७ मीटरची सर्वोत्तम थ्रो असणाऱ्या डीपी मनूने ८४.१४ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सहावे स्थानावर ही स्पर्धा संपवली. पहिल्यांदाच जागतिक अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत भारताचे तीन खेळाडू पहिल्या तीनमध्ये होते. ही भारतासाठी एक अभिमानाची बाब होती.

ओडिशाच्या पुरी जिल्ह्यातील कोठासाही गावातील किशोर जेना म्हणाला, “मी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्तरावर खेळत होतो आणि त्यामुळे मला भीती वाटत होती की, मी चांगला खेळू शकेन की नाही. ही माझी पहिली वर्ल्ड चॅम्पियनशिप होती आणि मी माझ्या कामगिरीवर खूश आहे. नीरज चोप्राने वेळोवेळी सल्ला देऊन प्रोत्साहन दिल्याचे त्याने सांगितले.”

२७ वर्षीय किशोर जेना म्हणाला, “मी हंगेरीला पोहचलो त्यावेळी माझ्याकडे फार कमी वेळ उरला होता कारण, लगेचच स्पर्धेला सुरुवात होणार होती. त्यामुळे मी माझ्या थ्रोवर लक्ष केंद्रित करत होता, दरम्यान नीरज आम्हाला प्रोत्साहन देत होता. एक थ्रो खराब झाल्यावर मी त्याला विचारले की हे वाईट झाले आहे, आता काय करायचे? तो म्हणाला, ‘विसर आणि पुढच्या थ्रो वर लक्ष केंद्रित कर. पुढचे थ्रो चांगले होतील, काळजी करू नका.’ असे बोलून त्याने खूप आत्मविश्वास दिला.”

हेही वाचा: World Athletics Championships: 4×400 रिलेमध्ये आशियाई विक्रम मोडणाऱ्या भारतीय संघाचे अंतिम फेरीत पदकाने दिली हुलकावणी

युवा खेळाडू जेना पुढे म्हणाला, “फायनलमध्ये १२ खेळाडूंपैकी तीन भारतीय होते आणि त्यानंतर पहिल्या सहामध्ये आमच्या तिघांची नावे होती. त्यामुळे भारतीय असण्याचा एक वेगळाच अभिमान वाटला.” भारताने ही ऐतिहासिक कामगिरी कशी साजरी केली, असे विचारले असता तो म्हणाला, “साजरा करण्याची वेळ कुठे आहे. रात्री ११.३० वाजता रूमवर पोहोचलो कारण, सकाळी लवकरची फ्लाइट होती.”

घरी परतल्यानंतर आई-वडिलांसोबत आनंद कसा साजरा करणार, असे विचारले असता त्याने सांगितले की, “तयारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून घरी गेलेलो नाही. शेवटचे २०२१मध्ये घरी गेलो होतो. तेव्हापासून मी पटियाला येथील शिबिरात पुढील स्पर्धेसाठी तयारी करण्यात व्यस्त आहे. ब्रेक घेतल्यावर लय बिघडते. मला अजूनही आशियाई क्रीडा स्पर्धा आणि ऑलिम्पिक पात्रता फेरीची तयारी करायची आहे, त्यामुळे मला वाटत नाही की कदाचित मी या वर्षी मी घरी जाऊ शकेन.”

तो म्हणाला, “आई-वडिलांचा चेहरा बघूनही बरेच दिवस झालेत. त्यांना स्मार्टफोन कसा चालवायचा हे माहित नाही. लहान बहीण घरी आल्यावर तिला व्हिडीओ कॉल केला.” सहा बहिणींमध्ये मी सर्वात लहान भाऊ आहे. जेनाचे वडील भातशेती करतात. सर्व मुलींच्या लग्नासाठी आर्थिक अडचणींचा सामना करत असतानाही, मुलाची स्वप्ने पूर्ण करण्यात त्यांनी कधीही मागे-पुढे पाहिले नाही. CISF मध्ये सेवा करणारा जेना भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या लक्ष्य ऑलिम्पिक पोडियम योजनेचा (TOPS) भाग नाही.

हेही वाचा: International Beach Tennis Championships: आंतरराष्ट्रीय बीच टेनिस स्पर्धेत भारताची घोडदौड कायम; उन्नत, विश्वजीतची शानदार कामगिरी

जेना म्हणाला, “मी पूर्वी व्हॉलीबॉल खेळायचो पण २०१५ पासून भालाफेक खेळत आहे. भुवनेश्वरच्या स्पोर्ट्स हॉस्टेलपासून माझ्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि आता पटियाला SAI केंद्रात प्रशिक्षण घेत आहे. कुटुंबातील कोणीही कोणत्याही खेळात याआधी आलेले नाही. एक साधे मध्यमवर्गीय कुटुंब आहे ज्याची स्वप्ने मला पूर्ण करायची आहेत.”

लेबनॉनमध्ये या वर्षी ओपन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या किशोर जेनाला आशा आहे की आशियाई क्रीडा स्पर्धेत जागतिक चॅम्पियनशिपचा अनुभव उपयोगी पडेल. तो म्हणाला, “आम्ही जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळवू शकलो नाही, पण हा अनुभव हांगझोऊ गेम्समध्ये नक्कीच उपयोगी पडेल. माझा प्रयत्न आता प्रत्येक स्पर्धेत पदक जिंकण्याचा असेल आणि आता मोठ्या स्पर्धेत कोणतीही भीती किंवा संकोच नाही. आशा आहे की, नीरज चोप्राने जी प्रक्रिया सुरू केली आहे ती आम्ही पुढे नेऊ शकू.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Javelin throw kishore jena did not go home for two years to prepare for the world championship no hope this year avw
Show comments