पीटीआय, नवी दिल्ली

ऑलिम्पिक स्पर्धेत पॅरिसमध्येही भालाफेक प्रकारात ९० मीटरच्या टप्प्यापासून वंचित राहिलेल्या भारताच्या नीरज चोप्राने आपण हा विषय आता देवावर सोडूया, असे उत्तर देत या प्रश्नाला मोठ्या खुबीने टाळले.

Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा जास्त भाविक महाकुंभमध्ये सहभागी होणार; २ लाख कोटींच्या उलाढालीची शक्यता; योगी सरकारची तिजोरी भरणार
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!
cm Devendra fadnavis loksatta
महाकालीचे दर्शन शुभसंकेत, ठरवल्यापेक्षा मोठे काम होणार – फडणवीस
Olympics to visit India How is the 2036 Games being planned Why are more than one city preferred 
ऑलिम्पिकचे भारतभ्रमण? २०३६ च्या स्पर्धेचे नियोजन कसे? एकापेक्षा अधिक शहरांना का पसंती?
loksatta kalachi ganit Sankranti Eclipse Zodiac
काळाचे गणित: संक्रांतीची तिथी?
Ajit Pawar discussion with Amit Shah in Delhi
अजित पवारांची दिल्लीत अमित शहांशी चर्चा

नीरज कारकीर्दीत विजयमंचावर राहिल्यापासून या ९० मीटरच्या टप्प्याचा पाठलाग करत आहे. त्याच्या बरोबरच्या आणि नंतर आलेल्या काही खेळाडूंनी हा मैलाचा दगड गाठला. मात्र, नीरजचा भाला अजून ८८ व ८९ मीटरमध्येच अडकत आहे. पॅरिसमध्येही पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटर फेक करत सुवर्णपदक पटकावले. टोक्यो ऑलिम्पिकनंतर नीरजला अनेकदा त्याच्या कंबरेच्या दुखापतीने त्रस्त केले. ऑलिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवरही नीरजच्या या दुखापतीने डोके वर काढले होते. पण, त्यानंतरही नीरजने सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवले.

आपल्या कामगिरीविषयी नीरज म्हणाला,‘‘जे काही सुरू आहे, ते सर्वांच्या समोर आहे. मी प्रयत्नांत कुठेही कमी पडत नाही. तुम्ही ९० मीटर टप्प्याबाबत विचारत असाल, तर ते आपण देवावर सोडून देऊया. कामगिरी चांगली करणे आणि भाला किती लांब जातो हे पाहणे इतकेच आपल्या हाती आहे. पॅरिसमध्ये मी ९० मीटरचा टप्पा गाठेन असे वाटले. पण, तसे घडले नाही. आता पुढील दोन किंवा तीन स्पर्धांमध्ये मी शंभर टक्के योगदान देईन.’’

हेही वाचा >>>Duleep Trophy 2024 : ‘आम्ही जे काही कठोर पाऊल उचलले…’, जय शाहांचे श्रेयस-इशानबाबत मोठे वक्तव्य

प्रथम लुसाने आणि नंतर १३, १४ सप्टेंबर रोजी ब्रुसेल्स येथील होणाऱ्या डायमंड लीगच्या टप्प्यानंतर नीरज मांडीच्या दुखापतीबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेणार आहे. यातून झटपट बरे होण्यासाठी शस्त्रक्रिया हा सर्वोत्तम पर्याय मानला जात आहे. गेल्या वर्षी जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्यापासून नीरज या दुखापतीचा सामना करत आहे. त्यामुळे लुसाने येथील नीरच्या कामगिरीवर लक्ष राहील.

‘‘पॅरिसमध्ये अर्शदने विक्रमी फेक केल्यानंतर मला कामगिरी सुधारण्याची गरज होती. पण, केवळ शंभर टक्के शारीरिक तंदुरुस्ती नसल्यामुळे मला अपयश आले. मला अंतर कमी करता आले असते. पात्रता आणि अंतिम फेरीत माझ्याकडून केवळ एकच फेक अचूक झाली आणि ती देखील हंगामातील सर्वोत्तम ठरली. म्हणजेच मला सुवर्णपदकाच्या कामगिरीसाठी दुखापतीतून पूर्णपणे मुक्त होणे आवश्यक आहे,’’असे नीरज म्हणाला.

हेही वाचा >>>Samit Dravid : कुणी म्हटलं ‘ज्युनियर वॉल’ तर कुणी भावी ‘हिटमॅन’, द्रविडच्या मुलाच्या षटकाराने वेधले सर्वांचे लक्ष

विश्रांतीनंतर नीरजचा स्वित्झर्लंडमध्ये सराव

ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदकानंतर नीरज चोप्राने काही दिवस अपेक्षित विश्रांती घेतली. विश्रांतीनंतर नीरजने स्वित्झर्लंडमध्ये सरावाला सुरुवात केली असून, सर्वोत्तम कामगिरीने हंगामाची अखेर करण्यास तो उत्सुक आहे. यासाठी २२ ऑगस्टपासून लुसाने येथे सुरू होणाऱ्या डायमंड लीग स्पर्धेत तो सहभागी होणार आहे. ‘‘भारताला क्रीडा महासत्ता बनायचे असेल, तर खूप काही करण्याची आवश्यकता आहे. चीन, अमेरिका, जपान हे देश केवळ खेळाचा विचार करत नाहीत, ते देशाच्या सर्वांगीण विकासाचाही विचार करतात. त्यांच्याकडे खेळाडू शोधण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे आणि ती अत्यंत प्रामाणिक काम करते. आपल्याकडे प्रतिभा आणि मानसिकतेची कमतरता नाही. आपल्याला सर्वोत्तम प्रशिक्षकांची गरज आहे,’’ असे नीरज म्हणाला.

हंगाम संपण्यासाठी केवळ एकच महिना शिल्लक राहिला आहे. त्यामुळे हंगाम संपल्यावरच तज्ज्ञांशी चर्चा करून दुखापतीवर उपचार करण्याचा निर्णय घेईन. आतापर्यंत दुखापती संदर्भात योग्य ती काळजी घेत आलो आहे. त्यामुळे ती अधिक वाढली नाही. म्हणूनच अशी काळजी घेऊन मी अन्य खेळाडूंसारखा हंगाम कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.नीरज चोप्रा

Story img Loader