World Athletics Championships: भारताचा स्टार अ‍ॅथलीट नीरज चोप्राने जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्याने पहिल्याच प्रयत्नात ८८.७७ मीटर भालाफेक करत अंतिम फेरीत धडक मारली. नीरजसोबत डीपी मनू देखील अ गटात आहे, तर किशोर जेना हा एकमेव भारतीय गट ब मध्ये आहे. नीरज चोप्राने जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ८५ मीटरपेक्षा जास्त भालाफेक करून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रताही मिळवली आहे. पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठी किमान ८५.५० मीटर आवश्यक आहे आणि नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८८.७७ मीटर अंतर पार केले.

नीरजशिवाय डीपी मनूनेही जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवली आहे. तीन प्रयत्नांमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या ८१.३१ मीटर होती, जी त्याने दुसऱ्या प्रयत्नात गाठली. त्याने पहिल्या प्रयत्नात ७८.१० आणि तिसऱ्या प्रयत्नात ७२.४० हे अंतर पार केले. पहिल्याच प्रयत्नात नीरजने मोसमातील सर्वोत्तम कामगिरी केली. यापूर्वी त्याची हंगामातील सर्वोत्तम कामगिरी ८८.६७ होती. चॅम्पियनशिपमधील अंतिम फेरीसाठी पात्रता चिन्ह ८३ मीटर ठेवण्यात आले आहे, जे नीरजने पहिल्याच प्रयत्नात सहज पार केले. या स्पर्धेचा अंतिम सामना २७ ऑगस्ट रोजी होणार आहे. याशिवाय आपल्या कामगिरीच्या जोरावर तो २०२४ मध्ये पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. पॅरिस ऑलिम्पिक २६ जुलै ते ११ऑगस्ट दरम्यान होणार आहे.

India vs New Zealand 2nd Test Updates in Marathi
IND vs NZ : ‘तो तर अजून…’, शोएब अख्तरने विराटच्या निवृत्तीबद्दल प्रश्न विचारताच वीरेंद्र सेहवागने दिले चोख प्रत्युत्तर
Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक…
Neymar Makes Comeback For Al Hilal After Year Long Recovery
Neymar : नेयमारचं यशस्वी पुनरागमन; अल हिलालचा अल ऐनवर विजय
Rishabh Pant cryptic insta story
Rishabh Pant : दिल्ली कॅपिटल्स ऋषभ पंतला सोडणार? इन्स्टावर शेअर केलेल्या स्टोरीने वेधलं सर्वांचं लक्ष
Rishabh Pant Monstrous 107 Meter Biggest Six on Tim Southee Bowling Goes Out of Chinnaswamy Stadium IND vs NZ
IND vs NZ: बापरे! ऋषभ पंतचा १०७ मी. लांब गगनचुंबी षटकार, चेंडू थेट स्टेडियमबाहेर अन् किवी खेळाडू झाले अवाक्; VIDEO व्हायरल
West Indies Women vs New Zealand Women, 2nd Semi Final Chinelle Henry viral video
WI vs NZ : धक्कादायक! झेल घेताना खेळाडूच्या चेहऱ्यावर आदळला वेगवान चेंडू, VIDEO होतोय व्हायरल
Rohit Sharma Statement on India All Out At 46 and Batting First Decision After Winning Toss In Press Conference IND vs NZ
Rohit Sharma: “माझ्यामुळे संघाची ही स्थिती…”, रोहित शर्माचे भारत ४६ वर ऑल आऊट झाल्यानंतर मोठे वक्तव्य, नाणेफेकीच्या निर्णयाबद्दल पाहा काय म्हणाला?
PV Sindhu enters the second round of the Denmark Open Badminton Tournament sports news
सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश

अ‍ॅथलेटिक्समधील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र होण्यासाठी, किमान ८३ मीटर भालाफेक आवश्यक आहे किंवा गटातील अव्वल खेळाडू असणे आवश्यक आहे. नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८३ मीटरपेक्षा जास्त अंतर पार केले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. नीरज वगळता कोणत्याही खेळाडूला पहिल्या प्रयत्नात ८३ मीटर अंतर पार करता आले नाही.

हेही वाचा: Asia Cup 2023: आशिया कपवर कोरोनाचं संकट? श्रीलंकेच्या प्रमुख दोन खेळाडूंना झाली कोविडची लागण

नीरजचा मोसमातील सर्वोत्तम स्कोअर

नीरज चोप्राची ही या मोसमातील सर्वोत्तम धावसंख्या आहे. दुखापतीतून परतल्यापासून तो लॉसने डायमंड लीगमध्ये फॉर्ममध्ये नव्हता, परंतु या स्पर्धेत त्याने पहिल्या थ्रोवर खूप अंतर गाठण्यात यश मिळविले. एकाच थ्रोच्या जोरावर त्याने चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आणि ऑलिम्पिकपर्यंत मजल मारली आहे. आतापर्यंत या स्पर्धेत भारताला एकदाही सुवर्णपदक जिंकता आलेले नाही. गेल्या वेळी नीरजने या स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. यावेळी जर त्याने सुवर्णपदक जिंकले तर तो आणखी एक इतिहास घडवेल. अ‍ॅथलेटिक्समधील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या पात्रता फेरीत एकूण २७ खेळाडूंनी सहभाग घेतला. यापैकी १२ खेळाडूंनी अंतिम फेरी गाठली. नीरज चोप्रा हा फायनलमध्ये आपले स्थान निश्चित करणारा पहिला अ‍ॅथलीट होता.

हेही वाचा: Virat Kohli: आशिया कपपूर्वी कोहलीने BCCIचा नियम मोडला? गोपनीयतेचा भंग केल्याने अधिकारी संतापले, जाणून घ्या

नीरज अभिनव बिंद्राशी बरोबरी करू शकतो

नीरजने जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्यास तो सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राची बरोबरी करेल. असे केल्याने, ऑलिम्पिक आणि जागतिक चॅम्पियनशिपमध्ये वैयक्तिक सुवर्ण जिंकणारा नीरज हा दुसरा खेळाडू ठरेल. यापूर्वी नेमबाज अभिनव बिंद्राने २००८ च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक तर २००६ मध्ये नेमबाजीत सुवर्णपदक पटकावले होते.