अल्टिमेट फिटनेस सेंटरच्या जय दाभाडे याने जिल्हा स्तरावरील शरीरसौष्ठव स्पर्धेत विजेतेपद मिळवत ‘पुणे श्री’ किताब मिळविला. ही स्पर्धा पुणे जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेने आयोजित केली होती.
गणेश कला क्रीडा केंद्र येथे झालेल्या या स्पर्धेत १६२ खेळाडूंनी भाग घेतला. सर्वोत्तम प्रगत खेळाडूचा मान अजित थोपटे, तर बेस्ट पोझरचे पारितोषिक सचिन चव्हाण व सागर जाधव यांना देण्यात आले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या हस्ते झाला. या वेळी क्रीडा संघटक डॉ. संजय मोरे, परीक्षित थोरात, शांताराम जाधव, स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे आदी उपस्थित होते. स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रा. नाना फटाले, महादेव सकपाळ व विक्रम भिडे यांनी काम पाहिले.
स्पर्धेतील गटवार निकाल- ५५ किलो-१.विशाल वंजारे, २.अतुल माकर, ३.गणेश गावंडे. ६० किलो-१.योगेश देठे, २.कुणाल जगताप, ३.कुणाल वाळुंज. ६५ किलो-१.सचिन चव्हाण, २.राहुल सरपाळे, ३.रोहित काकडे. ७० किलो-१.अजित थोपटे, २.संतोष बोडेकर, ३.एम.व्ही.नारायण. ७५ किलो-१.गौरव शिंदे, २.परशुराम जाधव, ३.मंगेश डोंगरखोस. ८० किलो-१.जय दाभाडे, २.महंमद असिफ, ३.इंद्रजित पांडे. ८० किलोवरील-१.गोपाळ थापा, २.सागर जाधव, ३.अभिजित भोसले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा