Jay Shah and Rahul Dravid meeting for two hours: भारतीय संघाने २०१३ पासून एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. यादरम्यान टीम इंडियाने दोन एकदिवसीय विश्वचषक, चार टी-20 विश्वचषक आणि दोन आयसीसी कसोटी विश्व चॅम्पियनशिपमध्ये निराशा केली आहे. आता भारत ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. यावेळी संघाकडून ट्रॉफी उंचावण्याची अपेक्षा आहे. यासाठी भारतीय खेळाडू प्रचंड घाम गाळत आहेत. त्याचबरोबर मैदानाबाहेरही योजना आखल्या जात आहेत. या बाबतीत बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यात दीर्घ चर्चा झाली.

जवळपास दोन तास जय शाह आणि द्रविड यांच्यात बैठक झाली. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या दोन टी-२० सामन्यांपूर्वी दोघांची भेट झाली होती. दोघांमधील हे संभाषण ही नियमित प्रक्रिया असल्याचे बोलले जात आहे, मात्र आशिया चषक आणि विश्वचषकाच्या संदर्भात दीर्घ संभाषण झाल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. जय शहा राहत असलेल्या हॉटेलमध्ये ही बैठक झाली. तेव्हा टीम इंडिया दुसऱ्या हॉटेलमध्ये होती. अशा स्थितीत राहुल द्रविडला त्यांच्याकडे जावे लागले. जय शाह एका खाजगी दौऱ्यासाठी यूएसमध्ये होता आणि १३ ऑगस्ट रोजी पाचव्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यादरम्यान ते टी.व्हीवर दिसले.

icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन
thane district senior citizen home voting
ठाणे जिल्ह्यात गृहमतदानाला सुरुवात
election day fun facts election day activities voting activities on Election Day
मतदान दिनाच्या गमतीजमती!
akola vidhan sabha election 2024
प्रचारातून विकासाचे मुद्दे हद्दपार, जातीय राजकारण, बंडखोरी व मतविभाजनाचे गणितच चर्चेत; सर्वसामान्यांचे जिव्हाळ्याच्या प्रश्नांना बगल
Champions Trophy Cricket Tournament BCCI demand to organize matches in Dubai sport news
पाकिस्तानात खेळण्यास नकारच! दुबईत सामने आयोजित करण्याची ‘बीसीसीआय’ची मागणी
maharashtra assembly election 2024, airoli,
ऐरोलीच्या बंडाला ‘ठाण्या’ची साथ ?

कोचिंग स्टाफ वाढू शकतो –

हे नेहमीच्या बैठकीसारखे वाटू शकते, परंतु त्याचे महत्त्व कमी लेखता येणार नाही. या भेटीत आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेसाठी काही खास नियोजन करण्यात आले असावे, हे स्पष्ट झाले आहे. या बैठकीनंतर कोचिंग स्टाफ वाढवला जाऊ शकतो, असे समोर आले आहे. २०२१ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी बीसीसीआयने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले होते.

हेही वाचा – Asia Cup 2023 पूर्वी केएल राहुलबद्दल रवी शास्त्रींनी दिला महत्त्वाचा इशारा; म्हणाले, “तुम्ही एखाद्या खेळाडूला…”

आशिया चषक स्पर्धा ३० ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी शिबिरात सहभागी होणाऱ्या खेळाडूंबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अहवालानुसार, सर्व खेळाडू २३ ऑगस्ट रोजी बंगळुरूमध्ये एकत्र येतील आणि २४ ऑगस्ट रोजी अलूरमध्ये शिबिर सुरू होईल. विशेष म्हणजे भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. नुकत्याच झालेल्या मालिकेतील पराभवामुळे संघावर बरीच टीका झाली आहे. बीसीसीआय विश्वचषकाचे आयोजन करत आहे. अशा स्थितीत मंडळाला संघाने ट्रॉफी उंचावताना पाहायचे आहे.

संघ निवडीपूर्वी बुमराहकडे लक्ष –

आशिया चषक स्पर्धेसाठी संघ कधी निश्चित होणार याची माहिती अद्याप निवड समितीला मिळालेली नाही. येत्या काही दिवसांत ही निवड प्रक्रिया होईल, असा अंदाज आहे. काही स्रोतांनी असे सुचवले आहे की, आयर्लंडमधील पहिल्या टी-२० सामन्यानंतर नंतर निवड होऊ शकते. संघ व्यवस्थापनाला जसप्रीत बुमराहला एकदा मैदानावर खेळताना पाहायचे आहे. दुखापतीमुळे बुमराह सप्टेंबर २०२२ पासून व्यावसायिक क्रिकेटमधून बाजूला झाला होता. पहिल्या टी-२० मध्ये त्याचा फिटनेस पाहून संघ व्यवस्थापन निर्णय घेईल.

हेही वाचा – विराट कोहलीला २०२४ चा टी-२० विश्वचषक खेळवावा, भारताच्या माजी फलंदाजी प्रशिक्षकाने सांगितले का आहे त्याची गरज?

राहुल आणि अय्यर यांच्यावर सर्वांच्या नजरा –

जोपर्यंत केएल राहुल आणि श्रेयस अय्यरचा संबंध आहे, त्या दोघांनी अलीकडेच बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) येथे सराव सामन्यात भाग घेतला होता. जर दोघेही खेळण्यासाठी तंदुरुस्त असतील, तर टीम इंडियासाठी ही आनंदाची बातमी असेल. राहुल आणि अय्यर यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची मधली फळी खूपच कमकुवत दिसत आहे. दोघेही परतले तर संघ मजबूत होईल.