Virat Rohit will not play in Duleep Trophy 2024 : बीसीसीआयने नुकतीच दुलीप ट्रॉफी २०२४ साठी चार संघांची घोषणा केली. ही स्पर्धा ५ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. तिचा पहिला सामना टीम ए आणि टीम बी यांच्यात होणार आहे. टीम इंडियाचे अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेत खेळत आहेत. पण रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार नाहीत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली न खेळण्याचे कारण सांगितले आहे.

जय शाह विराट-रोहितबद्दल काय म्हणाले?

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या बातमीनुसार, विराट-रोहितबद्दल प्रतिक्रिया देताना जय शाह म्हणाले, “रोहित-विराटसारख्या खेळांडूशिवाय सर्वजण खेळत आहेत. याचे कौतुक करायला हवे. बुची बाबू स्पर्धेत इशान किशन आणि श्रेयस अय्यर खेळत आहेत. पण आम्ही विराट आणि रोहितसारख्या खेळाडूंवर खेळण्यासाठी दबाव टाकू शकत नाही. असे केल्याने दुखापत होण्याचा धोका असतो. तुम्हाला माहित असेल की, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील प्रत्येक आंतरराष्ट्रीय खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळत नाही. आम्ही खेळाडूंचा आदर करतो.”

विराट-रोहितसह ‘या’ खेळाडूंना दुलीप ट्रॉफीतून वगळले –

भारत आणि बांगलादेश यांच्यात १९ सप्टेंबरपासून पहिली कसोटी खेळली जाणार आहे. त्याआधी टीम इंडियाचे खेळाडू दुलीप ट्रॉफी खेळू शकले असते. त्यांना सामन्याचा सरावही मिळाला असता, मात्र आता संघांची घोषणा झाल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की रोहित आणि विराट कोहली दुलीप ट्रॉफी खेळणार नाहीत. याशिवाय जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, शार्दुल ठाकूर आणि हार्दिक पंड्या यांचाही संघात समावेश करण्यात आलेला नाही.

हेही वाचा – “ऋषभ पंत कसोटी कर्णधारपदाचा उमेदवार नाही का?”, संतप्त माजी क्रिकेटपटूने दुलीप ट्रॉफीवरुन उपस्थित केला प्रश्न

दुलीप ट्रॉफीसाठी टीम ए बद्दल बोलायचे तर शुबमन गिलला कर्णधार बनवण्यात आले आहे. या संघात केएल राहुल, तिलक वर्मा, शिवम दुबे आणि मयंक अग्रवालसारखे दिग्गज खेळाडू आहेत. अभिमन्यू ईश्वरनकडे टीम बी चे कर्णधारपद सोपवले आहे. रवींद्र जडेजा, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत आणि मोहम्मद सिराज यांना त्यात स्थान मिळाले आहे. ऋतुराज गायकवाडकडे टीम सी चे कर्णधारपद आहे.

हेही वाचा – Lamine Yamal : धक्कादायक! स्पेनचा फुटबॉलपटू लॅमिन यमालच्या वडिलांवर चाकू हल्ला, हॉस्पिटलमध्ये दाखल

ज्यामध्ये साई सुदर्शन, सूर्यकुमार यादव आणि रजत पाटीदार या संघात आहेत. तर डी टीमचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे आहे. इशान किशन हा या टीमचा भाग आहे. उल्लेखनीय आहे की, इशान किशनला बीसीसीआयने करारातून काढून टाकले होते. तो बराच काळ देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत नव्हता. पण आता तो परतला आहे. बुची बाबू क्रिकेट स्पर्धेतही तो खेळणार आहे.