Jay Shah journey and success story : जय शाह भारतीय क्रिकेटमधील एक महत्त्वाचा युवा लीडर म्हणून उदयास आले आहेत. आपल्या बुद्धिमत्तेने आणि नेतृत्व क्षमतेच्या जोरावर त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आहे. ३५ वर्षीय जय शाह यांची नुकतीच आयसीसीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. जय शाह हे पद भूषवणारे सर्वात तरुण व्यक्ती आहेत. जय शाहांचा क्रिकेट व्यवस्थापनातील प्रवास कसा राहिला आहे? जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जय शाहांचा क्रिकेट व्यवस्थापनातील प्रवास २००९ मध्ये सुरू झाला, जेव्हा त्यांनी जिल्हा स्तरावर सेंट्रल क्रिकेट बोर्ड अहमदाबाद (सीबीसीए) मध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते गुजरात क्रिकेट असोसिएशन (जीसीए) मध्ये सामील झाले आणि २०१३ मध्ये संयुक्त सचिव झाले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव म्हणून काम करताना जय शाह यांनी आपल्या कार्यक्षमतेने आणि कठोर परिश्रमाने सर्वांना प्रभावित केले. त्यांचे खेळाडूंशी असलेले चांगले संबंध आणि व्यवस्थापन कौशल्य यामुळे त्यांना या पदापर्यंत पोहोचवले आहे.

जय शाहांनी अनेक आव्हानांवर केली मात –

जय शाहांच्या नेतृत्वाखाली बीसीसीआयने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यांनी महिला क्रिकेटच्या विकासासाठी महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) सुरू केली, जी खूप यशस्वी झाली. या लीगमध्ये महिलांच्या टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक करार दिले जातात, ज्यामुळे महिला क्रिकेटला मोठी चालना मिळाली आहे. याव्यतिरिक्त, शाह यांनी भारतीय महिला क्रिकेट संघासाठी एकसमान सामना शुल्क लागू करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. कोविड-१९ महामारीच्या काळातही, जेव्हा जगभरात क्रीडा उपक्रम ठप्प झाले होते, तेव्हा शाहांनी आपल्या अचूक नियोजनाने आयपीएल आणि इतर स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले. त्यांनी बायो-बबलची निर्मिती आणि त्यामधील वैद्यकीय सुविधा व्यवस्थापित केल्या, ज्यामुळे स्पर्धा सुरक्षितपणे पार पडली.

हेही वाचा – Jay Shah ICC Chairman: जय शाह यांची ICC च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड, जागतिक क्रिकेटमध्ये आता भारताचा दबदबा

भारतीय क्रिकेटला दिले नवीन एनसीए –

जय शाहांनी खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य देण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली. त्यांच्या कार्यकाळात, भारताने १० कसोटी हंगाम खेळले, ज्यामध्ये खेळाडूंना अधिक प्रोत्साहन दिले गेले. जय शाहांची आणखी एक मोठी कामगिरी म्हणजे राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) ची नवीन निर्मिती. आता हे देशांतर्गत हंगामात एकाच ठिकाणी अनेक प्रथम श्रेणी सामने आयोजित करून अकादमी उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून काम करेल. भारतीय क्रिकेटमध्ये जय शाहांचे यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी आपल्या नेतृत्व क्षमता, खेळाडूंशी चांगले संबंध आणि अचूकपणे घेतलेले निर्णय याने भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेले आहे. त्यांच्या या यशांनी त्यांना एक प्रभावी आणि यशस्वी प्रशासक म्हणून स्थापित केले.

हेही वाचा – जय शाह यांची मोठी घोषणा; BCCIकडून भारतीय क्रिकेटपटूंवर पैशांचा पाऊस, बक्षीस रक्कम जाहीर

टी-२० विश्वचषक विजयात बजावली महत्त्वाची भूमिका –

रोहित शर्माने या वर्षी टीम इंडियाला टी-२० विश्वचषक जिंकून दिल्यानंतर जय शाह यांचे कौतुक केले होते. रोहित शर्मा म्हणाला होता, या जेतेपदाचे श्रेय जय शाह यांना ही जाते. खरे तर, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना भारतीय टी-२० संघातून वगळावे आणि बीसीसीआयने नवीन लोकांना संधी द्यावी, या बाजूने सारे जग होते. त्यादरम्यान, जय शाह या गोष्टीच्या बाजूने होते की रोहित शर्मा टी-२० संघाचा कर्णधार असेल आणि भारत त्याच्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वचषक २०२४ खेळेल. रोहित शर्मानेही त्यांच्या शब्दांवर खरे उतरत आणि १७ वर्षांनंतर भारतासाठी टी-२० विश्वचषक जिंकला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jay shah success story how he traveled a long distance journey from cbca member to icc chairman vbm