Jay Shah To be Appointed as ICC Chairman: बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह हे आयसीसीचे म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष होऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले ३० नोव्हेंबर रोजी त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर तिसऱ्या टर्मच्या शर्यतीपासून स्वतःला दूर केले आहे, ज्यामुळे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या अध्यक्ष होण्याबद्दल चर्चा वाढली आहे.

हेही वाचा – Robin Uthappa: “माझी जी अवस्था झाली होती त्याची लाज वाटत असे”, रॉबिन उथप्पाने उलगडला तो अवघड काळ

prithviraj chavan congress cm
मविआची सत्ता आल्यास पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार? स्वतःच उत्तर देताना म्हणाले…
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Challenges facing by political parties in Maharashtra state assembly elections 2024
लक्षवेधी लढत : प्रतिष्ठा, अस्तित्व आणि वर्चस्वाची लढाई
Who will be Chief minister if Mahayuti wins
महायुतीचा विजय झाल्यास मुख्यमंत्री कोण होणार? भाजपाकडून मिळालेले ‘हे’ संकेत महत्त्वाचे
NCP Ajit Pawar group
Nawab Malik : “आम्ही किंगमेकर राहणार, आमच्याशिवाय कोणतंही सरकार…”, अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadik : धनंजय महाडिक आगीतून फुफाट्यात? महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरून माफी मागताना नवं वक्तव्य, म्हणाले…
Asaduddin Owaisi Statement over Modi
Asaduddin Owaisi : “आंबेडकर जिंदा है तो गोडसे…”, असदुद्दीन ओवैसींची पंतप्रधान मोदींच्या विधानावर जोरदार टीका

आयसीसीच्या या पदासाठी जय शाह अर्ज भरणार की नाही हे २७ ऑगस्टपर्यंत स्पष्ट होईल, ही अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. आयसीसी अध्यक्ष प्रत्येकी दोन वर्षांच्या तीन कार्यकाळासाठी पात्र असतात आणि न्यूझीलंडचे वकील बार्कले यांनी आतापर्यंत त्यांच्या कार्यकाळाची चार वर्षे पूर्ण केली आहेत.

आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी बोर्डाला कळवले आहे की ते तिसऱ्या टर्मसाठी उभे राहणार नाहीत आणि नोव्हेंबरच्या अखेरीस त्यांचा सध्याचा कार्यकाळ संपल्यावर ते पद सोडतील, असे आयसीसीने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. बार्कले यांची नोव्हेंबर २०२० मध्ये आय़सीसीचे स्वतंत्र अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. २०२२ मध्ये त्यांची या पदावर पुन्हा निवड झाली.

हेही वाचा – Women’s T20 World Cup: बांगलादेशातील अराजकतेचा क्रिकेट बोर्डाला फटका, आता ‘या’ देशात होणार महिला टी-२० वर्ल्डकप; ICCने केली घोषणा

आयसीसीचे अध्यक्ष होण्यासाठी काय आहेत नियम?

ICC नियमांनुसार, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १६ मते आहेत आणि आता विजेत्यासाठी नऊ मतांचे बहुमत (५१%) आवश्यक आहे. यापूर्वी अध्यक्ष होण्यासाठी विद्यमान उमेदवाराला दोन तृतीयांश बहुमत आवश्यक होते. आयसीसीने म्हटले आहे की, ‘विद्यमान संचालकांना आता २७ ऑगस्ट २०२४ पर्यंत पुढील अध्यक्ष पदासाठी अर्ज सादर करावे लागतील आणि जर एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर निवडणूक होईल आणि नवीन अध्यक्षांचा कार्यकाळ १ डिसेंबर २०२४ पासून सुरू होईल. ‘

जय शाह हे आयसीसी बोर्डातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक मानले जातात. ते सध्या आयसीसीच्या वित्त आणि व्यावसायिक व्यवहार (Finance and Commercial Affairs) उप-समितीचे प्रमुख आहेत. मतदान करणाऱ्या १६ पैकी बहुतांश सदस्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. सध्या, शाह यांच्या बीसीसीआय सचिवपदाच्या कार्यकाळात एक वर्ष शिल्लक आहे ज्यानंतर त्यांना ऑक्टोबर २०२५ पासून अनिवार्य तीन वर्षांचा कुलिंग ऑफ कालावधी घ्यावा लागेल.

हेही वाचा – Sourav Ganguly : ‘अशा घटना जगभर घडतात…’, कोलकाता प्रकरणावरील वक्तव्य सौरव गांगुलीला भोवलं, जारी केलं निवेदन

सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या बीसीसीआयच्या घटनेनुसार, पदाधिकारी तीन वर्षांच्या कूलिंग ऑफ कालावधीपूर्वी सहा वर्षे पदावर राहू शकतो. एकूण, एखादी व्यक्ती एकूण १८ वर्षे या पदावर राहू शकते. राज्य संघटनेत नऊ वर्षे आणि बीसीसीआयमध्ये नऊ वर्षे. जर शाह यांनी त्यांच्या सचिवपदावर एक वर्ष शिल्लक असताना आयसीसीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्याकडे बीसीसीआयमध्ये चार वर्षे शिल्लक राहतील.

जय शाह हे वयाच्या ३५व्या वर्षी आयसीसी इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष होऊ शकतात. जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर हे भारतीय आहेत ज्यांनी यापूर्वी आयसीसी अध्यक्षांची भूमिका पार पाडली आहे.