टीम इंडियाला १९ जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळायची आहे. मालिकेपूर्वी भारतीय (India vs South Africa) संघासाठी वाईट बातमी समोर आली. २२ वर्षीय युवा फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर करोना पॉझिटिव्ह आढळला. तो मालिकेबाहेर पडला आहे. त्यांच्या जागी जयंत यादवचा समावेश करण्यात आला आहे. जयंत आयपीएलच्या शेवटच्या हंगामात मुंबई इंडियन्सचा भाग होता. सध्या तो कसोटी संघासोबत दक्षिण आफ्रिकेत आहे. तो त्याच्या कारकिर्दीत फक्त एकच एकदिवसीय सामना खेळला आहे. त्याने फक्त एक धाव काढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारताच्या निवड समितीने जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत दुखापतग्रस्त झालेल्या मोहम्मद सिराजचा बॅकअप म्हणून एकदिवसीय संघात वेगवान गोलंदाज नवदीप सैनीचाही समावेश केला आहे. जयंत यादवच्या एकदिवसीय कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, त्याने एका सामन्यात नाबाद एक धावा काढली. याशिवाय त्याने एक विकेटही घेतली आहे. तो विशाखापट्टणम येथे न्यूझीलंडविरुद्ध ऑक्टोबर २०१६ मध्ये एकमेव एकदिवसीय सामना खेळला होता.

हेही वाचा – ओ तेरी..! रोहित शर्माच्या नव्या लूकमुळं सोशल मीडियावर खळबळ; फोटो पाहून चाहतेही झाले थक्क!

जयंत यादवने ५ कसोटीत १६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने एक शतक आणि अर्धशतकाच्या जोरावर २४६ धावा केल्या आहेत. लिस्ट-ए कारकिर्दीत त्याने ५९ सामन्यांत ५३ विकेट घेतल्या आहेत. २३ च्या सरासरीने ८९८ धावा केल्या आहेत.

भारताचा एकदिवसीय संघ : केएल राहुल (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशनविकेट (यष्टीरक्षक), यजुर्वेंद्र चहल, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक ठाकूर, मोहम्मद सिराज, जयंत यादव.