भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी बीसीसीआयने मोठा निर्णय घेत स्टार वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला संघातून मुक्त केले आहे. मात्र, त्यांच्या जागी संघात कोणाचाही समावेश करण्यात आलेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत बीसीसीआयने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे. टीम इंडियाच्या व्यवस्थापनासह अखिल भारतीय निवड समितीने वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातून रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. जयदेव उनाडकटच्या नेतृत्वाखालील सौराष्ट्र संघ २०२२-२३च्या रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्याता आला आहे.

सौराष्ट्र संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या चालू हंगामातील उपांत्य फेरीत कर्नाटकचा ४ गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. बंगाल आणि सौराष्ट्र यांच्यातील अंतिम सामना १६ फेब्रुवारीपासून कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात जयदेव उनाडकट सौराष्ट्रचे नेतृत्व करणार आहे. यामुळे त्याला संघातून टीम इंडियातून मुक्त करण्यात आले आहे.

१७ फेब्रुवारीपासून दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना होणरा आहे. टीम इंडियाचे सांघिक संयोजन पाहता टीम इंडियात जयदेवला संधी मिळण्याची शक्यता कमी होती. यामुळेच त्याने आपल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची स्पर्धा सौराष्ट्रने जिंकली होती. त्यावेळी देखील संघाचा कर्णधार जयदेव उनाडकट होता.

हेही वाचा – INDW vs PAKW: स्मृती मंधानाच्या जागी ‘या’ स्टार खेळाडूला मिळाली संधी, पाहा टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शुबमन गिल, इशान किशन, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, उमेश यादव</p>

हेही वाचा – लोकल क्रिकेटचा विषयचं हार्ड! भन्नाट कॅचची सचिन तेंडुलकरसह आंतरराष्ट्रीय क्रिकेपटूंनाही पडली भुरळ, पाहा VIDEO

ऑस्ट्रेलिया संघ:डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), नॅथन लियॉन, टॉड मर्फी, स्कॉट बोलँड, ट्रॅव्हिस हेड, मिचेल स्वेप्सन, अॅश्टन आगर, मिचेल स्टार्क, कॅमेरॉन ग्रीन, लान्स मॉरिस

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jaydev unadkat has been released from team india ahead of the second test against australia vbm