Jaydev Unadkat plays in his first ODI since November 2013: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळवला जात आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियामध्ये २ बदल करण्यात आले आहेत. कर्णधार हार्दिक पांड्याने तिसर्या वनडेसाठी स्टार गोलंदाज जयदेव उनाडकटला १० वर्षांनंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये परत आणले आहे.
फॉर्मात नसलेल्या उमरान मलिकच्या जागी जयदेव उनाडकटला प्लेइंग इलेव्हनमध्ये एंट्री मिळाली आहे. उमरान पहिल्या दोन वनडेत फ्लॉप ठरला होता. त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. त्याने २ सामन्यात ६ षटके गोलंदाजी केली होती. आपली छाप सोडण्यात तो पूर्णपणे अपयशी ठरला होता.
शेवटचा वनडे २०२३ मध्ये खेळला गेला –
जयदेव उनाडकटने टीम इंडियासाठी शेवटचा सामना २०१३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. यानंतर तो एकदिवसीय संघात पुनरागमन करू शकला नाही. आता या खेळाडूने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत टीम इंडियामध्ये पुनरागमन केले आहे. उनाडकटला आयपीएल २०२३ पूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत स्थान मिळाले होते, परंतु तो प्लेइंग इलेव्हनचाचा भाग होऊ शकला नव्हता.
जयदेव उनाडकटची क्रिकेट कारकीर्द –
जयदेव उनाडकटच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे, तर त्याने भारतासाठी ७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ८ विकेट घेतल्या आहेत. त्याने १० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून १४ विकेट घेतल्या आहेत. त्याने ४ कसोटी सामन्यात ३ बळी घेतले आहेत. विशेष म्हणजे उनाडकटने १०३ प्रथम श्रेणी सामन्यात ३८२ विकेट घेतल्या आहेत. त्याने ११६ लिस्ट-ए सामन्यात १६८ विकेट घेतल्या आहेत.
हेही वाचा – Kapil Dev: “मी बीसीसीआयचा अध्यक्ष असतो, तर…”; कपिल देव यांनी टीम इंडियाच्या वेळापत्रकावरून साधला निशाणा
इशान किशनचे मालिकेतील सलग तिसरे अर्धशतक –
सामन्याबद्दल बोलायचे तर, आजच्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यानुसार भारतीय संघाने १५ षटकानंतर बिनबाद ११० धावा केल्या आहेत. शुबमन गिल ४२ चेंडूत ४१ धावांवर खेळत आहे. त्याचबरोबर इशान किशन ५७ चेंडूत ५९ धावांवर नाबाद आहे. इशान किशनचे या मालिकेतील सलग तिसरे अर्धशतक आहे. यापूर्वी त्याने पहिल्या दोन डावातही अर्धशतक झळकावले होते.