Jeetan Patel’s Big Statement on Ben Stokes : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना धरमशालाच्या मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ २१८ धावांत सर्वबाद झाला. यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजांनी दुसरा दिवस संपेपर्यत शानदार फलंदाजी करत ८ गडी गमावून ४७३ धावा केल्या. दरम्यान भारताकडून रोहित शर्माने शतक झळकावले. त्याने १०३ धावांची खेळी खेळली. पण रोहितला इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने बाद केले. यानंतर इंग्लंडच्या सहाय्यक प्रशिक्षकाने यावर मोठे वक्तव्य केले आहे.
“स्टोक्सच्या नशिबात हेच लिहिले होते”-
बेन स्टोक्सने ९ महिन्यांनंतर प्रथमच गोलंदाजी केली आणि पहिल्याच चेंडूवर रोहितला बोल्ड केले, तेव्हा रोहित आपले शतक पूर्ण करून पूर्णपणे सेट झाला होता. तरीही त्याला बेन स्टोक्सचा चेंडू समजू शकला नाही आणि तो बाद झाला. यानंतर इंग्लंडचे सहाय्यक प्रशिक्षक जीतन पटेल म्हणाले की, “स्टोक्सच्या नशिबात हेच लिहिले होते की, तो इतका शानदार चेंडू टाकेल आणि रोहित शर्माची विकेट घेईल, ज्याने शतक पूर्ण केले होते. आपल्या सर्वांना माहीत आहे की आमचे गोलंदाजी आक्रमण कसे आहे. विशेषत: येथील परिस्थितीमध्ये तुम्ही दोन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाजांसोबत जाता आणि अशा परिस्थितीत स्टोक्सने तिसऱ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका बजावावी असे तुम्हाला वाटते.”
“स्टोक्सला गोलंदाजी करताना पाहून बरे वाटले” –
जीतन पटेल पुढे म्हणाले, “स्टोक्सला गोलंदाजी करताना पाहून बरे वाटले पण आम्हाला आता सावध राहावे लागेल. कारण त्याने नुकतेच गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. तसेच तिसऱ्या दिवशी आधी आम्हाला उर्वरित दोन विकेट्स मिळवायच्या आहेत. यानंतर आम्ही खेळाच्या पुढील स्थितीवर काम करू शकतो. खेळ कुठे आहे आणि किती पुढे जाऊ शकतो यावर उद्याच्या शेवटपर्यंत आपण काम केले पाहिजे. आम्ही खूप सकारात्मक आहोत आणि यापुढेही राहू.”
हेही वाचा – NZ vs AUS 2nd Test : ग्लेन फिलीप्समध्ये संचारला ‘सुपरमॅन’, एका हाताने पकडला लबूशेनचा अफलातून कॅच, पाहा VIDEO
सामन्याबद्दल बोलायचे, तर आज भारताने आठ बाद ४७३ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली आणि उर्वरित दोन विकेट चार धावा करताना गमावल्या. आज भारताला पहिला धक्का कुलदीप यादवच्या (३०) रूपाने बसला. जेम्स अँडरसनने कुलदीपला यष्टिरक्षक फॉक्सकरवी झेलबाद केले. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ही ७०० वी विकेट होती.
त्याचवेळी शोएब बशीरने बुमराहला (२०) यष्टीचीत करून भारताचा डाव ४७७ धावांवर संपुष्टात आणला.तिसऱ्या दिवशी लंचपर्यंत इंग्लंडने दुसऱ्या डावात ५ बाद १०३ धावा केल्या होत्या. भारताचा संघ अजूनही १५६ धावांनी मागे आहे. इंग्लिश संघाला डावाने पराभवाचा धोका आहे. लंचच्या आधीच्या चेंडूवर अश्विनने बेन स्टोक्सला क्लीन बोल्ड केले. या विकेटसह अंपायरने लंच घोषित केले.