दुबईतील एटीपी टेनिस स्पर्धेच्या दुहेरीत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारल्याने भारताच्या जीवन नेदुनचेझियान याला जागतिक क्रमवारीत कारकीर्दीतील सर्वोत्तम ६८ वे स्थान मिळाले आहे. मात्र, लिएंडर पेस हा २३ स्थाने घसरुन ९६ व्या स्थानी पोहोचला आहे.
डावखुऱ्या जीवनने त्याचा सहकारी पुरव राजा याच्यासमवेत दुबईत दमदार कामगिरीची नोंद केली होती. त्यामुळे त्या दोघांना या कामगिरीचा लाभ झाला. त्यात राजाला १७ स्थानांची आघाडी मिळाल्याने तो ७९ व्या स्थानी पाहोचला आहे.
दरम्यान रोहन बोपन्ना हा अद्यापही भारताचा अव्वल दुहेरी टेनिसपटू असून तो ३८ व्या स्थानावर आहे. तर त्याचा दुहेरीतील साथीदार दिविज शरण हा एका स्थानाने घसरुन ४० व्या स्थानावर आला आहे.