Jemimah Rodrigues Viral Video : महिला प्रीमियर लीगचे रंगतदार सामने सुरु असून क्रिकेटच्या मैदानात धावांचा पाऊस पडत आहे. पण एका सामन्यादरम्यान भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू जेमिमा रोड्रिग्स प्रकाशझोतात आली आहे. क्रिकेटच्या मैदानात आक्रमक फलंदाजी करुन जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या यादीत जेमिमाने नाव कोरलं आहे. पण तिच्याकडे असलेले उत्तम गुण तमाम चाहत्यांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरले आहेत. गोलंदाजांचा समाचार घेण्याबरोबरच चाहत्यांचं मनोरंजन करण्यातही जेमिमा माहीर आहे. महिला प्रीमियर लीगचा पहिला सामना ५ मार्चला दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर यांच्यात झाला. पण या सामन्यादरम्यान मुंबईच्या ब्रेबोर्न स्टेडियमवर जेमिमाने केलेला भांगडा डान्सने तमाम चाहत्यांचं लक्ष वेधलं.
एकीकडे दिल्ली कॅपिटल्सची तुफान फटकेबाजी सुरु असतानाच जेमिमाने मैदानात क्षेत्ररक्षण करत असताना जबरदस्त डान्स करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. जेमिमाने वेगवेगळे डान्स मुव्ज सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. प्रेक्षकांनाही जेमिमाचा डान्स पाहून चिअर अप केलं. सामना संपल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची उप कर्णधार जेमिने तिचा डान्स व्हिडीओ ट्वीटरवर पोस्ट केला. त्यानंतर चाहत्यांनीही हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर शेअर केला.
इथे पाहा व्हिडीओ
आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत २० षटकात २ गडी गमावत २२३ धावा केल्या. पण या धावांचा पाठलाग करताना आरसीबीच्या नाकीनऊ आले. आरसीबीची २२३ धावांचं आव्हान गाठताना दमछाक झाली आणि फलकावर १६३ धावाच रचल्या. कर्णधार स्मृती मंधानाने ३५ धावा, अलिसा पेरीने ३१ धावा, हीदर नाइटने ३४ आणि मेगन शटने नाबाद ३० धावा केल्या.