Jemimah Rodrigues Father Ivan issues clarification : भारतीय महिला संघातील स्टार फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्जचे खार जिमखाना येथील सदस्यत्व रद्द करण्यात आलं. जेमिमाच्या वडिलांनी खार जिमखाना क्लब परिसर धार्मिक विधींसाठी वापरल्याचे कळवण्यात आले होते. आता तिचे वडिल इव्हान रॉड्रिग्ज यांनी खार जिमखान्याने “धार्मिक कार्यांसाठी” क्लब परिसर वापरल्याबद्दल तिचे सदस्यत्व रद्द केल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया दिली आहे.

खार जिमखान्याने रविवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जेमिमा हिचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय क्रिकेटपटूच्या वडिलांबद्दल असे म्हटले जात आहे की, ते गेल्या अनेक वर्षांपासून या क्लबच्या सदस्यत्वाचा गैरवापर करत होते आणि धर्मांतरण सभा आयोजित करत होते. मात्र, इवान यांनी आपल्यावरील आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. इव्हान यांनी असा दावा केला की त्यांनी केवळ प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करून प्रार्थना सभा आयोजित केल्या. इव्हान यांनी सांगितले की त्यांनी एप्रिल २०२३ पासून अनेक प्रसंगी खार जिमखाना सुविधांचा उपयोग प्रार्थना सभांसाठी केला होता. मात्र, कोणत्याही नियमांचे उल्लंघन झालेले नाही.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
maharastra vidhan sabha election 2024 shivsena ubt workers upset over muslim candidate
उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे शिवसैनिक नाराज
Marathi actor abhijeet kelkar reaction on trolling about suraj Chavan his post
“मी ब्राम्हण जातीतला असलो तरी…”, सूरज चव्हाणबद्दल केलेल्या पोस्टवरील ट्रोलिंगवर अभिजीत केळकरचं भाष्य, म्हणाला, “मला शिव्या देऊन..
Malegaon Central Assembly Constituency, Mahayuti Candidate, Maha Vikas Aghadi
Malegaon Assembly Constituency : मालेगावात उमेदवारच नसल्याने महायुतीची निवडणुकीपूर्वी हार
An emotional video of a delivery boy having food in the middle of the road while delivering an order went viral on social media
परिस्थिती सगळं काही शिकवते! डिलिव्हरी बॉयचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी

इव्हान रॉड्रिग्ज यांचे स्पष्टीकरण –

इव्हान यांनी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एका नोटमध्ये पोस्ट केले, “माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या अलीकडील आणि चुकीच्या अहवालांबाबत काही तथ्ये सांगू इच्छितो. एप्रिल २०२३ पासून एका वर्षाच्या कालावधीत आम्ही अनेक वेळा प्रार्थना सभांच्या उद्देशाने खार जिमखाना येथे सुविधांचा लाभ घेतला होता. मात्र, खार जिमखान्याची कार्यपद्धती आणि अधिकाऱ्यांची पूर्ण माहिती घेऊन हे काम करण्यात आले. प्रार्थना सभा सर्वांसाठी खुल्या होत्या आणि मीडिया लेखांमध्ये चुकीच्या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारे ‘धर्मांतरण सभा’ नव्हत्या.

हेही वाचा – Mohammed Shami : मोहम्मद शमीची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी का निवड करण्यात आली नाही? जाणून घ्या

इव्हान यांनी आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, “जेव्हा आम्हाला प्रार्थना सभा आयोजित करणे थांबवण्यास सांगण्यात आले, तेव्हा आम्ही जिमखान्याच्या निर्णयाचा आदर केला आणि तत्काळ तसे केले. सभासद आणि पाहुण्यांच्या दरातील तफावतीची माहिती मिळाल्यावर आम्ही तात्काळ थकबाकी मंजूर केली. आम्ही प्रामाणिकपणे कायद्याचे पालन करणारे लोक आहोत. इतर कोणाचीही गैरसोय न करता आम्ही आमचे कर्तव्य पार पाडतो. तेव्हा खोटे दावे आणि चुकीच्या माहिती पसरवणं निराशाजनक आहे. आम्ही सर्वांचं कायमच चागलं व्हाव याची कामना केली आहे आणि पुढेही तेच करू.”

हेही वाचा – IND vs NZ: भारताला सलग दुसरा कसोटी सामना गमावल्यास बसणार धक्का, WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी कसं असणार समीकरण?

खार जिमखाना व्यवस्थापकीय समिती सदस्य शिव मल्होत्रा ​​यांनी यापूर्वी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले होते: “आमच्या असं निदर्शनास आलं आहे की जेमिमाह रॉड्रिग्सचे वडील ब्रदर मॅन्युएल मिनिस्ट्रीज नावाच्या संस्थेशी संबंधित होते. सुमारे दीड वर्षांसाठी त्यांनी प्रेसिडेंशियल हॉल बुक केला आणि ३५ कार्यक्रम आयोजित केले. तिथे काय चालले होते हे आपल्या सर्वांना माहीत आहे… आपण देशभरात धर्मांतराबद्दल ऐकतो, पण ते आपल्या इथेच होत आहे. तेथे नृत्य, महागडे संगीत उपकरणे आणि मोठे पडदे होते. खार जिमखान्याचे उपविधी घटनेच्या नियम 4A नुसार, खार जिमखाना कोणत्याही धार्मिक कार्याला परवानगी देत ​​नाही.”

Story img Loader