Jemimah Rodrigues Stunning Catch Viral Video : नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात अव्वल स्थानासाठी रंगतदार सामना झाला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीच्या आख्ख्या संघाला मुंबईच्या गोलंदाजांनी १०५ धावांवर गारद केलं. त्यानंतर १०६ धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबईच्या संघाने दिल्लीच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. मुंबईने ८ गडी राखून १०६ धावांचं लक्ष्य गाठलं आणि विजयाच्या हॅट्ट्रिकला गवसणी घातली.

मुंबईसाठी सलामीला उतरलेल्या यस्तिका भाटिया आणि हेली मॅथ्यूज यांनी पॉवर प्ले मध्ये धडाकेबाज खेळी केली. पण एलिस कॅप्सीच्या गोलंदाजीवर हेलीने षटकार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, मैदानात असलेल्या जेमिमा रॉड्रीग्जने हवेत उडी मारून हेलीचा अप्रतिम झेल घेतला. महिला प्रिमीयर लीगमधील आतापर्यंतचा उत्कृष्ट झेल घेतल्याने जेमिमावर कौतुकाचा वर्षाव होता आहे. जेमिमाने हवेत उडी मारून घेतलेल्या झेलचा व्हिडीओ दिल्ली कॅपिटल्सने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

नक्की वाचा – मुंबईच्या सायका इशाकने तगड्या फलंदाजांना गुंडाळलं, दिल्लीच्या शफाली वर्माचा उडवला त्रिफळा, पाहा Video

इथे पाहा व्हिडीओ

दिल्लीने मुंबईसमोर १०६ धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण मुंबईच्या सलामीवीर फलंदाज यस्तिका भाटिया आणि हेली मॅथ्यूजने दिल्लीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. यास्तिकाने चौफेर फटकेबाजी करत ३२ चेंडूत ४१ धावा कुटल्या. तर हेलीने ३१ चेंडूत ३२ धावांची खेळी साकारली. पण यास्तिका भाटियाची तंबूत परतल्यानंतर मुंबईच्या धावसंख्येचा वेग मंदावला. त्यानंतर हेली मॅथ्यूही ३२ धावांवर एलिसच्या गोलंदाजीवर बाद झाली. त्यानंतर नॅट सिवर ब्रंट आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने मुंबईचा डाव सावरला आणि १५ षटकांत १०६ धावांचं लक्ष्य गाठून सलग तिसऱ्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

मुंबई इंडियन्सच्या सायका इशाकने १३ धावा देत 3 विकेट घेतल्या. तसेच इसी वँगनेही भेदक गोलंदाजी करून 3 विकेट घेतल्या आणि हेली मॅथ्यूजनेही १९ धावांमध्ये 3 विकेट्स घेण्याची अप्रतिम कामगिरी केली. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला पॉवर प्ले मध्येच जखडून टाकले होते. शफाली वर्माची विकेट गेल्यानंतर दिल्लीची धावसंख्येत घसरण झाली. दिल्लीने पाच षटकांत २५ धावा केल्या. त्यामुळे दिल्लीला १८ षटकांमध्ये १०५ धावांपर्यंतच मजल मारता आली. कारण दिल्लीचे सर्व फलंदाज मुंबईच्या गोलंदाजांपुढे नांगी टाकत होते.

Story img Loader