Jimmy Anderson claims India nerves : भारत आणि इंग्लंड संघांतील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने दुसऱ्या डावात २५५ धावा केल्या असून इंग्लंडसमोर ३९९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. यानंतर इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन म्हणाला, रविवारी भारताची फलंदाजीची शैली खूपच सावध दिसली. आमच्यासाठी किती मोठी धावसंख्या पुरेशी ठरेल हे भारताला माहीत नव्हते, असे तो म्हणाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तिसऱ्या दिवशी इंग्लंडला ३९९ धावांचे लक्ष्य मिळाले, मात्र दुपारच्या सत्रात यापेक्षा मोठे लक्ष्य मिळेल असे वाटत होते. अँडरसन म्हणाला, ‘मला वाटते की, भारतीय संघ ज्या प्रकारे फलंदाजी करत होता त्यातून त्यांची अस्वस्थता दिसून येत होती. आमच्यासाठी किती मोठे लक्ष्य पुरेसे असेल, हे भारताला माहित नव्हते. कारण भारतीय संघाने मोठी आघाडी घेतल्यानंतरही त्यांचे फलंदाज खूप सावधपणे खेळत होते.’

अँडरसन पुढे म्हणाला, ‘आम्ही पाहिलं की रेहान अहमद क्रीजवर जाऊन फटके खेळत होता. सोमवारी काही वेगळे होणार नाही. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही जो खेळ खेळत आहोत, तोच खेळ खेळू. आम्ही जिंकलो किंवा हरलो याने काही फरक पडत नाही. कारण आम्ही खूप स्पर्धात्मक आहोत आणि आम्हाला प्रत्येक सामना जिंकायचा आहे, परंतु आम्हाला एका विशिष्ट पद्धतीने खेळायचे आहे.’

हेही वाचा – IND vs ENG 2nd Test : टीम इंडियाला मोठा धक्का! शुबमन गिलने शतकानंतरही वाढवली भारताची चिंता

दुसऱ्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात ३९६ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांवर आटोपला. टीम इंडियाकडे १४३ धावांची आघाडी होती. भारताने त्यांच्या दुसऱ्या डावात २५५ धावा केल्या आणि इंग्लंडला ३९९ धावांचे लक्ष्य दिले. ३९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने ४२ षटकानंतर ६ बाद १९४ धावा केल्या आहे. त्यांना विजयासाठी अजून २०५ धावांची गरज आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jimmy anderson claims india nerves were there to see as england chase 399 in ind vs eng 2nd test match vbm