जिओ आणि स्टार या दोन्ही विविध कंपन्या एकत्र झाल्या आहेत. त्यामुळे आता टीम इंडियाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांचा आनंद हॉटस्टार किंवा जिओस्टारवर घेता येईल, परंतु अद्याप याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण स्टार स्पोर्ट्सने जिओ आणि स्टारच्या विलीनीकरणाची घोषणा केली आहे.
जिओ सिनेमा आणि स्टार स्पोर्ट्सच्या विलीनीकरणानंतर हे स्पष्ट झाले आहे की, आता भारत आणि इंग्लंड यांच्यात जानेवारी आणि फेब्रुवारी २०२५ मध्ये होणारी टी-२० आणि एकदिवसीय मालिका जिओ सिनेमावर दिसणार नाही. प्रथम, भारतामध्ये दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाईल. यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे.
जिओसिनेमाची कंपनी व्हायकॉम १८ने बीसीसीआयकडून सप्टेंबर २०२४ मध्ये ५,९६३ कोटींना सामन्यांच्या लाईव्ह प्रक्षेपणाचे अधिकार घेतले होते, पण आता या विलीनीकरणानंतर यात बदल होणार आहे. सोमवारी, स्टारने जाहीर केले की २२ जानेवारी ते १२ फेब्रुवारी दरम्यानचे भारत वि इंग्लंड यांच्यात होणारे आठ सामने स्टार स्पोर्ट्स आणि डिस्ने + हॉटस्टारवर थेट प्रक्षेपित केले जातील.
Sports18 आणि JioCinema यांना खेळांचे स्ट्रीमिंग आणि प्रसारित करण्यापासून नाकारले जाणार नाही परंतु असे दिसते की स्टारचे प्लॅटफॉर्म प्राथमिक प्रसारक म्हणून काम करतील. स्टार स्पोर्ट्सने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अधिकृत घोषणेद्वारे याची माहिती दिली आहे.
जिओ सिनेमा ऐवजी हॉटस्टारवर भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० आणि एकदिवसीय मालिकेचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहायला मिळणार आहे. गेल्या वर्षी, Viacom 18 ने भारताच्या मायदेशातील सामन्यांचे (देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय) मीडिया हक्क विकत घेतले होते. यानंतर, स्टार नेटवर्कने त्यांचे बरेच ग्राहक गमावले, कारण IPL चे डिजिटल अधिकार देखील जिओ सिनेमाने विकत घेतले होते. पण आता दोन्ही कंपन्या विलीन झाल्या आहेत.
Viacom 18 ने 2023-28 सायकलसाठी भारतात खेळल्या गेलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सर्व सामन्यांचे टीव्ही आणि डिजिटल अधिकार दोन्ही ताब्यात घेतले होते. तेव्हापासून, स्पोर्ट्स 18 टीव्हीवर आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत दोन्ही सामने प्रसारित केले गेले आहेत, तर डिजिटल स्ट्रीमिंग JioCinema वर पाहिले जात आहे. मात्र, आता नवीन वर्षापासून परिस्थिती बदलणार आहे. विलीनीकरणानंतर, Jio ने JioStar नावाची वेबसाइट सुरू केली आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारचे नाव जिओस्टार असण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.