Jio Ipl 2023 cricket Plan: लवकरच IPL २०२३ सुरु होणार आहे. ३१ मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना खेळला जाणार आहे. मात्र ते सुरु होण्याआधीच क्रिकेटप्रेमींनी आयपीएलचे जुने सामने मॅचेस टीव्हीवर, मोबाईलवर बघायला सुरुवात केली आहे. मात्र क्रिकेटरसिकांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असणाऱ्या Reliance Jio ने आपल्या वापरकर्त्यांसाठी ३ जबरदस्त क्रिकेट प्लॅन लॉन्च केले आहेत. कोणत्या अडथळ्याशिवाय वापरकर्त्यांना आयपीएलचे सामने बघता यावेत म्हणून कंपनीने हे प्लॅन्स लॉन्च केले आहेत.
जिओने लॉन्च केलेल्या नवीन प्लॅन्समध्ये वापरकर्त्यांना दररोज ३ जीबी डेटा मिळणार आहे. जेणेकरून त्यांना आयपीएलच्या सामन्यांचा आनंद लुटता येईल. या प्लॅन्स व्यतिरिक्त, वापरकर्ते क्रिकेट अॅड-ऑनद्वारे १५० जीबी पर्यंत डेटा मिळवू शकतात. हे तिन्ही रिचार्ज प्लॅन्स काय आहेत ते जाणून घेऊयात.
९९९ रुपयांचा jio cricket plan
जर का तुम्हाला कोणत्याही अडचणीशिवाय आयपीएलच्या संपूर्ण सीझनचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही जिओचा ९९९ रुपयांचा क्रिकेट प्लॅन घेऊ शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला ८४ दिवसांची वैधता मिळते. दररोज ३जीबी डेटा वापरायला मिळणार आहे. या प्लॅनमध्ये २४१ रुपयांचे मोफत व्हाउचर उपलब्ध आहे ज्यामध्ये तुम्हाला ४० जीबी डेटा मिळू शकतो.
३९९ रुपयांचा jio cricket plan
जिओने लॉन्च केलेल्या क्रिकेट प्लॅनमध्ये तुम्ही ३९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन खरेदी करू शकता. यामध्ये वापरकर्त्यांना २८ दिवसांची वैधता मिळणार आहे. तसेच यातही दररोज ३ जीबी डेटा मिळणार आहे. रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना या प्लॅनसह ६१ रुपयांचे मोफत व्हाउचर देत आहे. ज्यामध्ये ६ जीबी देता मिळतो. तसेच यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग देखील करता येणार आहे.
हेही वाचा : Jio Recharge Plan: जिओच्या ‘या’ प्लॅन्समध्ये मिळणार डेली १.५ जीबी डेटा, जाणून घ्या
२१९ रुपयांचा jio cricket plan
२१९ रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज ३ जीबी डेटा मिळणार आहे. जीओचा ३ जीबी डेटा मिळणारा हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. मात्र या प्लॅनची वैधता खूपच कमी आहे. यामध्ये तुम्हाला फक्त १४ दिवसांची वैधता मिळणार आहे. या प्लॅनसह वापरकर्त्यांना २५ रुपयांच्या मोफत व्हाऊचरच्या मदतीने २ जीबी मोफत डेटा मिळवू शकतात. यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा फायदा देखील मिळणार आहे.
जिओ डेटा अॅड ऑन प्लान
तसेच या तीन प्लॅन व्यतिरिक्त जिओने क्रिकेट अॅड ऑन डेटा प्लॅन देखील लॉन्च केले आहेत. यामध्ये तुम्हाला २२२ रुपयांमध्ये ५० जीबी डेटा, ४४४ रुपयांमध्ये १०० जीबी डेटा व ६६७ रुपयांमध्ये १५० जीबी डेटा मिळणार आहे. आज म्हणजेच (२४ मार्च ) पासून या सर्व क्रिकेट प्लॅन्सचा लाभ घेऊ शकणार आहेत. तसेच या प्लॅनचा फायदा जुन्या आणि नवीन वापरकर्त्यांना घेता येणार आहे.