ENG vs SL Joe Root Century: इंग्लंड क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज जो रूटने शानदार शतक झळकावले आहे. लॉर्ड्सवर श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात २०६ चेंडूंत १८ चौकारांच्या मदतीने १४३ धावा केल्या. यासह जो रूटने कसोटी क्रिकेटमधील ३३वे शतक झळकावले आहे. लॉर्ड्सवरील कसोटीतील रुटचे हे सहावे शतक होते. या शतकाच्या जोरावर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या जो रूटने इतक्या धावा केल्या की विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. याशिवाय, तो फॅब 4 मध्ये सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा फलंदाज बनला.
जो रूटने कोहलीला टाकले मागे
जो रूटने कसोटी क्रिकेटमधील ३३वे शतक झळकावून विराट कोहलीला मागे सोडले. या खेळीदरम्यान कसोटीत पहिल्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या रुटने ७३०९ धावा केल्या आणि कोहलीला मागे टाकले. पहिल्या क्रमांकावर खेळताना कोहलीने आतापर्यंत कसोटीत ७३०३ धावा केल्या आहेत. कसोटीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रुट आता पाचव्या तर कोहली सहाव्या क्रमांकावर घसरला आहे.
कसोटीत चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा (डाव).
१३४९२ धावा – सचिन तेंडुलकर (२७५)
९५०९ धावा – महेला जयवर्धने (१९५)
९०३३ धावा – जॅक कॅलिस (१७०)
७५३५ धावा – ब्रायन लारा (१४८)
७३०९ धावा – जो रूट (१५०)
७३०३ धावा – विराट कोहली (१४५)
जो रूट फॅब 4 मध्ये नंबर वन
जो रूटने कसोटी क्रिकेटमधील आपले ३३वे शतक झळकावले आणि फॅब ४ फलंदाजांच्या यादीत सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा खेळाडू बनला. फॅब फोरमध्ये असलेल्या स्टीव्ह स्मिथ आणि केन विल्यमसन यांनी आतापर्यंत ३२ शतके केली आहेत तर विराट कोहलीच्या नावावर २९ शतके आहेत. यासह आता २०२० मध्ये फॅब फोरमध्ये चौथ्या स्थानी असलेला जो रूट सर्वाधिक ३३ शतकांसह पहिल्या स्थानी आला आहे.
हेही वाचा – Radha Yadav: पुरात अडकली होती भारतीय महिला क्रिकेटपटू, NDRF च्या पथकाने केली सुटका, पोस्ट करत मानले आभार
फॅब 4
जो रूट – ३३
स्टीव्ह स्मिथ – ३२
केन विल्यमसन – ३२
विराट कोहली – २९
फॅब फोर म्हणजे नेमकं काय?
स्टीव्ह स्मिथ, जो रूट, केन विल्यमसन आणि विराट कोहली यांना आधुनिक क्रिकेटमधील फॅब फोर म्हटले जाते. कसोटी क्रिकेटमधील फॅब फोर हा शब्द प्रथम न्यूझीलंड संघाचे माजी कर्णधार दिवंगत मार्टिन क्रो यांनी प्रथम वापरला होता. ऑगस्ट २०१४ मध्ये क्रिकइन्फोमधील एका लेखामध्ये त्यांनी भाकीत केले होते की;कोहली, रूट, स्मिथ आणि विल्यमसन हे फॅब फोरमधील फलंदाज आपापल्या देशांचे भावी कर्णधार बनतील.
जो रूटने केनला टाकलं मागे
जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर २०वे शतक झळकावले आणि केन विल्यमसनला मागे टाकले. केन विल्यमसनने आतापर्यंत मायदेशात कसोटी क्रिकेटमध्ये १९ शतके झळकावली आहेत. स्मिथने १६ तर कोहलीने घरच्या मैदानावर कसोटीत १४ शतके झळकावली आहेत.
फॅब 4 फलंदाजांची घरच्या मैदानावर कसोटी शतक
२० – जो रूट
१९ – केन विल्यमसन
१६ – स्टीव्ह स्मिथ
१४ – विराट कोहली
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक शतके
१५ – जो रूट*
११ – मार्नस लॅबुशेन
१० – केन विल्यमसन
९ – स्टीव्ह स्मिथ
९ – रोहित शर्मा</p>