England second innings and took a lead of 126 runs against India : भारत आणि इंग्लंड यांच्यात हैदराबादमध्ये मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू जो रुट फलंदाजीत काही खास करु शकला नाही, पण गोलंदाजीत त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. चेंडूने आश्चर्यकारक कामगिरी करताना त्याने चार विकेट्स घेतल्या. फलंदाजीत अपयशी ठरल्यानंतरही रुटने दोन डावांत दोन बड्या दिग्गजांना मागे टाकले.पहिल्या डावात जो रुटला केवळ २९ धावा करता आल्या होत्या, पण त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले. आता दुसऱ्या डावात त्याला केवळ दोन धावा करत इतिहास रचला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारताविरुद्ध जो रुट ठरला नंबर वन फलंदाज –

जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा आता पहिल्या क्रमांचा खेळाडू ठरला आहे. पहिल्या डावात त्याने या बाबतीत रिकी पाँटिंगची बरोबरी केली होती. आता दुसऱ्या डावात त्याने फक्त दोन धावा केल्या पण अव्वल स्थान काबीज केले आहे. रुटने आता भारताविरुद्ध सर्वाधिक २५५७ कसोटी धावा केल्या आहेत. पाँटिंग, कुक, क्लाइव्ह लॉईड आणि जावेद मियांदाद यांसारख्या दिग्गजांच्या यादीत त्याने अव्वल स्थान पटकावले आहे.

भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे फलंदाज (कसोटीमध्ये) –

जो रुट- २५५७
रिकी पाँटिंग- २५५५
ॲलिस्टर कुक- २४३१
क्लाइव्ह लॉईड- २३४४
जावेद मियांदाद- २२२८

हेही वाचा – IND vs ENG 1st Test : ऑली पोपच्या शतकाने इंग्लंडचे सामन्यात दमदार पुनरागमन, दुसऱ्या डावात घेतली १२६ धावांची आघाडी

याआधी जो रूटने पहिल्या डावात सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला होता. भारत आणि इंग्लंड कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रुटच्या नावावर आहे. मात्र या कसोटीत रूटला काही विशेष करता आलेले नाही. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात २४६ धावांत गारद झाला होता. १९० धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात गडगडला पण ऑली पोपने एकट्याने शानदार नाबाद शतक झळकावून डाव सांभाळला. इंग्लंडने तिसऱ्या दिवसअखेर जोरदार पुनरागमन करत दुसऱ्या डावात भारताविरुद्ध १२६ धावांची आघाडी घेतली.