Jofra Archer has been ruled out of the Ashes series: इंग्लंड क्रिकेट संघाला एक मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड संघाला जोफ्रा आर्चरच्या रूपाने धक्का बसला आहे. आयपीएल २०२३ मध्ये जोफ्रा आर्चर मुंबई इंडियन्सचा भाग होता, परंतु दुखापतीमुळे त्याला आयपीएलमधून बाहेर पडावे लागले. आता तो २०२३ च्या ऍशेस मालिकेतही खेळताना दिसणार नाही. जोफ्रा पुन्हा एकदा स्ट्रेस फ्रॅक्चरच्या समस्येशी झुंजत आहे.

जोफ्रा आर्चरच्या दुखापतीबाबत, इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे (ईसीबी) व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “जोफ्रा आर्चरसाठी ही वेळ त्रासदायक आणि निराशाजनक आहे. जोफ्रा बर्‍याच दिवसांनी परत आल्याने तो सतत बरा होण्याच्या दिशेने वाटचाल करत होता. पण कोपराच्या दुखापतीने तो पुन्हा एकदा काही काळासाठी बाहेर झाला आहे.”

IND vs ENG Pakistani Origin England Bowler Saqid Mahmood Denied Visa To India
IND vs ENG: पाकिस्तान वंशाच्या इंग्लंड खेळाडूला भारत व्हिसा नाकारला, भारत दौऱ्यात खेळू शकणार?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
IND vs ENG Aakash Chopra questioned absence of Shivam Dube from India squad for the upcoming T20I series
IND vs ENG : भारताच्या टी-२० संघात CSK च्या खेळाडूला संधी न मिळाल्याने माजी खेळाडू संतापला, उपस्थित केले प्रश्न
IND vs ENG T20I Series Full Schedule Timings and Squads in Detail
IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
IPL 2025 Time Table
IPL 2025 : ठरलं! ‘या’ दिवसापासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिला सामना ‘या’ तारखेला होणार
Bumrah may lose out on Test captaincy
कसोटी कर्णधारासाठी दीर्घकालीन पर्यायाची गरज; बुमराच्या क्षमतेवरून निवड समितीमध्येच संभ्रम
IND W vs IRE W Jemimah Rodrigues century helps Indian womens team register highest ODI score against Ireland
IND W vs IRE W : जेमिमा रॉड्रिग्जच्या पहिल्यावहिल्या शतकाच्या जोरावर भारताने घडवला इतिहास, केला ‘हा’ खास पराक्रम
Image of Indian Cricket Team
Ind vs Eng T20 Series : इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड, तब्बल एक वर्षानंतर शमीचे पुनरागमन

रॉब की पुढे म्हणाले की, “जोफ्राने लवकर परतावे अशी आमची इच्छा आहे. मला आशा आहे की आम्ही जोफ्राला इंग्लंडच्या जर्सीमध्ये पुन्हा मैदानावर सर्व फॉरमॅटमध्ये बघू, जरी थोडा वेळ लागला तरी. कोपरच्या दुखापतीमुळे आर्चर आयपीएल अर्धवट सोडून मायदेशी परतला होता, कारण त्याला खेळताना खूप त्रास होत होता.”

हेही वाचा – IPL 2023: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने रचला इतिहास; ‘हा’ कारनामा करणारा ठरला पाचवा संघ

जोफ्रा आर्चरने मार्च २०२१ पासून कसोटी क्रिकेट पासून दूर –

जवळजवळ २ वर्षे स्ट्रेस फ्रॅक्चरशी झुंज दिल्यानंतर जोफ्रा आर्चर डिसेंबर २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला. जोफ्रा आर्चरने वारंवार दुखापतींमुळे २०२१ पासून इंग्लंडसाठी एकही कसोटी सामना खेळलेला नाही. जोफ्रा आर्चरला आता इंग्लंड आणि ससेक्स संघांच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. या वर्षाच्या अखेरीस भारतात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी जोफ्रा पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी इंग्लंड क्रिकेट संघाला आशा आहे.

आयपीएल २०२३ मध्ये, मंगळवारी लीगच्या ६३ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. हा सामना लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळवला जाईल. मुंबई आणि लखनौचे संघ गुणतालिकेत अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरो असा आहे. पराभूत संघासाठी पुढील वाटचाल खडतर असेल. यासोबतच विजेत्या संघाचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग मोकळा होईल. दोन्ही संघ हा सामना व्हर्च्युअल नॉकआऊटप्रमाणे खेळतील.

Story img Loader