न्यूझीलंड क्रिकेट नियामक मंडळाचे संचालक जॉन बुकॅनन यांनी आपल्या मायदेशी म्हणजे ऑस्ट्रेलियात परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे न्यूझीलंड क्रिकेट नियामक मंडळाच्या संचालक पदावरून बुकॅनन यांना पायउतार व्हावे लागले  आहे. तरी, ६० वर्षीय बुकॅनन यांनी राजीनामा दिला की त्यांची हकालपट्टी करण्यात आली यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने नकार दिला आहे. त्यामुळे बुकॅनन यांच्या पदत्यागाचे नेमके कारण अजून गुलदस्त्यात आहे. बुकॅनन हे मे २०११ सालापासून न्यूझीलंड क्रिकेटच्या संचालक पदाचा कारभार पाहत होते. परंतु काही कौटूंबिक कारणांमुळे त्यांना मायदेशी म्हणजे ऑस्ट्रेलियात परत जाण्याचा निर्णय घ्यावा लागला असल्याचे मिळालेल्या माहितीतून समजते. तसेच तेथील स्थानिक माध्यमांच्याव्दारे समोर आलेल्या माहितीनुसार, बुकॅनन यांचे न्यूझीलंडचे सध्याचे संघ प्रशिक्षक माईक हसेन यांच्याशी बिनसले होते.

Story img Loader