न्यूझीलंड क्रिकेट नियामक मंडळाचे संचालक जॉन बुकॅनन यांनी आपल्या मायदेशी म्हणजे ऑस्ट्रेलियात परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे न्यूझीलंड क्रिकेट नियामक मंडळाच्या संचालक पदावरून बुकॅनन यांना पायउतार व्हावे लागले आहे. तरी, ६० वर्षीय बुकॅनन यांनी राजीनामा दिला की त्यांची हकालपट्टी करण्यात आली यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने नकार दिला आहे. त्यामुळे बुकॅनन यांच्या पदत्यागाचे नेमके कारण अजून गुलदस्त्यात आहे. बुकॅनन हे मे २०११ सालापासून न्यूझीलंड क्रिकेटच्या संचालक पदाचा कारभार पाहत होते. परंतु काही कौटूंबिक कारणांमुळे त्यांना मायदेशी म्हणजे ऑस्ट्रेलियात परत जाण्याचा निर्णय घ्यावा लागला असल्याचे मिळालेल्या माहितीतून समजते. तसेच तेथील स्थानिक माध्यमांच्याव्दारे समोर आलेल्या माहितीनुसार, बुकॅनन यांचे न्यूझीलंडचे सध्याचे संघ प्रशिक्षक माईक हसेन यांच्याशी बिनसले होते.
न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचे संचालक जॉन बुकॅनन यांचा पदत्याग
न्यूझीलंड क्रिकेट नियामक मंडळाचे संचालक जॉन बुकॅनन यांनी आपल्या मायदेशी म्हणजे ऑस्ट्रेलियात परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे न्यूझीलंड क्रिकेट नियामक मंडळाच्या संचालक पदावरून बुकॅनन यांना पायउतार व्हावे लागले असल्याचे म्हटले जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-07-2013 at 12:30 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: John buchanan leaves new zealand role