पीटीआय, जोहोर बारू : भारतीय कुमार हॉकी संघाने दडपणाखाली उत्कृष्ट खेळ करताना जोहोर चषक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. शनिवारी झालेल्या अंतिम लढतीत नियोजित वेळेतील १-१ अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा ५-४ असा पराभव केला. भारताने तिसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी

बचावपटूंची कसोटी लागलेला सामना नियोजित वेळेत १-१ असा बरोबरीत राहिला होता. त्यानंतर झालेल्या शूट-आऊटही ३-३ अशी बरोबरी झाली. त्यानंतर घेण्यात आलेल्या ‘सडन-डेथ’मध्ये भारताने बाजी मारली. भारताचा गोलरक्षक मोहित सुशीलकुमारची कामगिरी निर्णायक ठरली. भारताकडून ‘शूट-आऊट’ मध्ये विष्णूकांत सिंग, श्रद्धानंद तिवारी, बॉबी सिंग यांनी गोल केले. ऑस्ट्रेलियासाठी लियाम हर्ट, जायडेन अ‍ॅटकिन्स, ब्रुक्स जोशुआ यांनी गोल केले. शूटआऊटमधील

३-३ अशा बरोबरीनंतर ‘सडन-डेथ’ घेण्यात आले. यामध्ये भारताकडून उत्तम सिंग आणि सुदीप चिर्माको यांनी गोल केले. ऑस्ट्रेलियाच्या बर्न्‍सलाच गोल करण्यात यश आले. लियाम हर्ट, फोस्टर आणि जोशुआ यांचे गोल करण्याचे प्रयत्न व्यर्थ ठरले. नियोजित सामन्यातील दोन्ही गोल पूर्वार्धात झाले. भारताकडून १३व्या मिनिटाला सुदीपने गोल केला. मात्र, भारताला आघाडी राखता आली नाही. सामन्याच्या २८व्या मिनिटाला जॅक हॉलंडने ऑस्ट्रेलियाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. भारताने यापूर्वी २०१३ आणि २०१४मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. याशिवाय २०१२, २०१५, २०१८ आणि २०१९मध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला होता. त्यानंतर २०२० आणि २०२१मध्ये कोरोनामुळे स्पर्धा झाली नव्हती.