Jonny Bairstow Controversial Runout Stuart Broad Criticizes Australian Team: ऑस्ट्रेलियन संघाने लॉर्ड्स कसोटी सामना ४३ धावांनी जिंकला असेल, पण त्यांच्या विजयापेक्षा जॉनी बेअरस्टोच्या वादग्रस्त रनआऊटचीच अधिक चर्चा होत आहे. आता इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने ऑस्ट्रेलियन संघावर जबरदस्त हल्ला चढवला आहे. २०१८ मधील सँडपेपर घटनेची आठवण करून देत ब्रॉड म्हणाला की ऑस्ट्रेलियन संघात अद्याप कोणताही बदल झालेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्टुअर्ट ब्रॉडने लॉर्ड्स कसोटी सामन्यानंतर डेली मेलमधील आपल्या कॉलममध्ये लिहिले की, “मला सर्वात जास्त आश्चर्य वाटले. कारण ऑस्ट्रेलियन संघातील कोणत्याही वरिष्ठ खेळाडूने असा प्रश्न एकदाही विचारला नाही ते काय करतायेत. विशेषत: जेव्हा त्यांचा संघ गेल्या काही वर्षांत बदललेला संघ म्हणून स्वतःचा बचाव करत आहे.”

आपल्या कॉलममध्ये ब्रॉडने पुढे लिहिले की, “कोणीही थांबण्याचा प्रयत्न केला नाही, थांबा हे मला योग्य वाटत नाही, परंतु कोणालाही असे वाटले नाही, हे अपील रद्द करण्यात यावी. कारण बेअरस्टो कोणताही फायदा घेणार नव्हता आणि तो धावणारही नव्हता. षटक संपले आणि तो अशा विचित्र पद्धतीने बाद झाला.”

हेही वाचा – Suryakumar Yadav: “तो खेळत असताना त्याला…”, एबी डिव्हिलियर्सने सूर्यकुमार यादवला दिला खास सल्ला

पॅट कमिन्सला या निर्णयाचा पुढे पश्चाताप होईल –

ब्रॉडने आपल्या कॉलममध्ये ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सवरही टीका केली आणि म्हटले की, “पॅट कमिन्स खरोखरच एक चांगला माणूस आहे. एकदा सर्वकाही शांत झाल्यावर, जर त्याने शांत बसून विचार केला, तर त्याची चूक लक्षात येईल. जी त्याने कसोटी जिंकणे या ध्येयाने केली. मी ऑस्ट्रेलियाच्या निर्णयावर नाराज झालो, विशेषत: एक संघ म्हणून एक नवीन वारसा तयार करण्याबद्दल आणि २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून ते कसे बदलले याबद्दल त्यांचे बोलणे ऐकून मी नाराज झालो.”

जॉनी बेअरस्टोचे काय आहे प्रकरण?

खरं तर, इंग्लंडच्या डावातील ५२ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जॉनी बेअरस्टोने कॅमेरून ग्रीनचा शॉर्ट बॉल मागे सोडला होता. यानंतर, बेअरस्टो लगेच क्रीझच्या बाहेर गेला, जेव्हा चेंडू डेड झाला झाला नव्हता आणि यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीने तो आपल्या ग्लोव्हजमध्ये पकडला आणि स्टंपच्या दिशेने परत फेकला, ज्यामुळे बेल्स विखुरल्या आणि ऑस्ट्रेलिया संघाने आऊटची अपील केली. यानंतर थर्ड अंपायरने जॉनीला आऊट घोषित केले.