Jonny Bairstow is slammed by Kevin Pietersen for sledging Steve Smith: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांत पाच सामन्यांची ॲशेस मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४१६ धावा केल्या होत्या आणि दुसऱ्या डावात इंग्लंडला ३२५ धावांत सर्वबाद केले होते. सामन्याच्या चौथ्या दिवशी शनिवारी कांगारू संघ आपल्या दुसऱ्या डावात मजबूत दिसत आहे. दरम्यान, या सामन्यात इंग्लंडचा विकेटकीपर जॉनी बेअरस्टो ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथला स्लेजिंग करण्याचा प्रयत्न केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी स्टीव्ह स्मिथचे लक्ष विचलित करणे हे जॉनी बेअरस्टोचे उद्दिष्ट होते. मात्र, त्यात तो यशस्वी होऊ शकला नाही आणि तो स्वत:च सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागला. वास्तविक, स्मिथ चेंडू खेळल्यानंतर क्रिझवर हालचाल करत असताना बेअरस्टोने त्याला टोमणे मारण्यास सुरुवात केली. बेअरस्टो स्मिथला म्हणाला, मला वाटतं तू ‘स्ट्रिक्टली ऑस्ट्रेलिया’चा पुढचा खेळाडू आहेस.

यानंतर स्मिथने त्याला विचारले ते काय आहे? यावर बेअरस्टो म्हणाला की, हा ऑस्ट्रेलियात फार पूर्वी प्रसारित झालेला डान्स शो होता. याच्या प्रत्युत्तरात स्मिथचे उत्तर येते की याचा अर्थ असा असेल, असे मला वाटले नव्हते. दोघांमधील स्लेजिंगची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. स्टंप माइकमध्ये दोन्ही खेळाडूंमधील संभाषण कैद झाले. स्मिथने पहिल्या डावात शानदार शतक झळकावले.

हेही वाचा – Gurukul Ashram: भुवनेश्वर कुमारने जिंकली चाहत्यांची मने, ‘या’ कामासाठी दिली १० लाख रुपयांची देणगी

केविन पीटरसनने फटकारले –

दरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने बेअरस्टोला स्लेजिंग केल्याबद्दल जोरदार फटकारले आहे. पीटरसनने दावा केला की इंग्लंडचे खेळाडू ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी खूप मैत्रीपूर्ण वागत आहेत.

तो ऑन एअर म्हणाला, “हे सगळं खूप सोपं आहे आणि हे सगळं खूप छान आहे. तुम्ही मला सांगत आहात की रिकी पाँटिंग २००५ मध्ये गेरेंट जोन्सशी बोलणार आहे? मायकेल वॉन जस्टिन लँगरच्या शेजारी उभा राहून ‘ग्रेट मेट, व्हॉट अ डे…’ म्हणेल असे तुम्हाला वाटते का?पीटरसन म्हणाला, “तू गंमत करत आहेस का? तू खरच मजा करत आहेस का? मला आशा आहे की तो (इंग्लंडचा प्रशिक्षक) ड्रेसिंग रूममध्ये असेल आणि त्याला फटकारत असेल आणि म्हणत असेल ‘हे सर्व चांगले नाही, हे अजिबात योग्य नाही!’