Jonty Rhodes upset on Air India Facilities : भारतीय विमान कंपनी एअर इंडिया आपल्या सेवेबाबत अनेकदा चर्चेत असते किंवा वादात असते. कधी फ्लाईट उशिरा येते तर कधी फ्लाइटमध्ये दिलेले जेवण हे याचे कारण असते. या समस्येचा सामना सामान्य लोकांना करावा लागत असला तरी दक्षिण आफ्रिकेच्या एका माजी क्रिकेटपटूलाही मुंबई विमानतळावर या समस्येचा सामना करावा लागला. खरे तर दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्सलाही एअर इंडियाच्या खराब सेवेचा अनुभव आला, ज्यावर त्याने नाराजी व्यक्त केल्यानंतर एअर इंडियाने माफी मागितली.

जॉन्टी ऱ्होड्सचे काय आहे प्रकण?

जॉन्टी ऱ्होड्सने एक्सवरील पोस्टद्वारे संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मला मुंबईहून दिल्लीला जायचे होते आणि नंतर तेथून परत येऊन मुंबईहून केपटाऊनला जायचे होते, पण मुंबई विमानतळावरच मला एअर इंडियाच्या विमानाची दीड तासाहून अधिक वेळ वाट पाहावी लागली. इतकेच नाही तर नंतर विमाना मला तुटलेली सीट मिळाली. जॉन्टी ऱ्होड्सने सांगितले की, बोर्डिंग करण्यापूर्वी एअर इंडियाच्या लोकांनी त्याला एका पत्रावर सही करायला लावली होती.

Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
Bhosari assembly, politics, ajit Gavan, Mahesh Landge
भोसरी राजकारण तापलं; महेश लांडगेंच्या तंबीला अजित गव्हाणेंचे प्रत्युत्तर, म्हणाले “पराभवाच्या छायेतून…”
Alzarri Jospeh Banned for 2 Matches by West Indies Cricket Board For On Field Argument with WI Captain Shai Hope vs England ODI Match
अल्झारी जोसेफला रागात मैदान सोडणं पडलं भारी, क्रिकेट वेस्टइंडिजने केली मोठी कारवाई
rahul gandhi replied to devendra fadnavis
“लाल संविधान दाखवून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देतात” म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींचं प्रत्युत्तर; म्हणाले…

जॉन्टी ऱ्होड्स पोस्टमध्ये काय म्हणाला?

५५ वर्षीय जॉन्टी ऱ्होड्सने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘दुर्दैवाने माझा प्रवास सुरूच आहे. माझ्या मुंबई ते दिल्लीच्या फ्लाईटला दीड तास उशीर झाला. इतकेच नाही तर मी बोर्डिंगच्या वेळी एका पत्रावर स्वाक्षरी केली.ज्यावर लिहिले होते की माझी सीट खराब आहे आणि मी तिचा स्वीकार करत आहे. आता मी पुढील ३६ तासांची वाट पाहत नाही. ज्यामध्ये मला दिल्लीहून मुंबईला परत यावे लागेल आणि इथिओपियन एअरलाइन्सच्या फ्लाइटने थेट केपटाऊनला जावे लागेल.”

हेही वाचा – Samit Dravid : राहुल द्रविडचा मुलगा समित भारताच्या १९ वर्षाखालील संघात निवड होऊनही विश्वचषकात का खेळू शकणार नाही? जाणून घ्या

एअर इंडियाने मागितली माफी –

माजी क्रिकेटपटूच्या या पोस्टमुळे एअर इंडिया व्यवस्थापन तात्काळ अॅक्शनमध्ये आले आणि जॉन्टी ऱ्होड्सने पोस्टवर प्रतिक्रिया दिले. इंडियाने म्हटले की, ‘सर, तुमचा अनुभव ऐकून आम्हाला वाईट वाटले. निश्चिंत राहा, आम्ही तुमच्या चिंतेची सखोल चौकशी करू आणि तुमचा अभिप्राय आंतरिकरित्या शेअर केला जाईल याची खात्री करू.’