Jos Buttler breaks Rohit Sharma’s record for fastest 10000 runs in T20Is: सध्या इंग्लंडमध्ये टी-२० ब्लास्ट स्पर्धा खेळली जात आहे. या टूर्नामेंटमध्ये दररोज नवनवीन विक्रम रचले जात, तर काही विक्रम मोडले जात आहेत. दरम्यान, बुधवारी जोस बटलरच्या खेळीच्या जोरावर लँकेशायरने १५ षटकांत ४गडी गमावून १७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात डर्बीशायरला ७ गडी गमावून १५० धावाच करता आल्या. इंग्लंडच्या जोस बटलरने ८३ धावांची तुफानी खेळी करत भारतीय कर्णधार रोहित शर्माचा एक मोठा विक्रम मोडला आहे. यासोबतच त्याने मोठी कामगिरीही केली आहे. बटलरने तुफानी खेळी खेळली.

शुक्रवारी रात्री लँकेशायरकडून खेळणाऱ्या जोस बटलरने डर्बीशायरविरुद्ध अवघ्या ३९ चेंडूत ८३ धावांची तुफानी खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ८ चौकार आणि ६ षटकार निघाले. सुरुवातीपासूनच बटलरने गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले आणि मैदानाच्या प्रत्येक दिशेला मोठे फटके खेळले.

IND vs BAN T20 Highest Score with India Scoring 200 Plus Runs Most Often in Mens T20I Cricket
IND vs BAN: टीम इंडियाने सर्वात मोठ्या धावसंख्येसह केला विश्वविक्रम, टी-२० क्रिकेटच्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच संघ
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
IND vs BAN Team India broke Afghanistan's record
IND vs BAN : भारताने उभारली टी-२० मधील सर्वात मोठी धावसंख्या, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील दुसराच संघ
Sanju Samson Smashes First T20I Hundred in IND vs BAN and Broke Rohit Sharma Record
Sanju Samson: संजू सॅमसनचे पहिले टी-२० शतक, रोहितचा मोठा विक्रम मोडत ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय फलंदाज
IND vs BAN 1st T20 Match Hardik Pandya broke Virat Kohlis record for most match winning sixes in T20I
Hardik Pandya : हार्दिकने मोडला विराटचा खास विक्रम! भारतासाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू
Sarfaraz Khan Double Century Becomes First Mumbai Cricketer To Score Double Hundred in Irani Cup
Sarfaraz Khan Double Century: सर्फराझ खानने इराणी कपमध्ये झळकावले द्विशतक, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला मुंबईचा क्रिकेटपटू
Vaibhav Suryavanshi scores fastest hundred for India in U19
Vaibhav Suryavanshi : १३ वर्षीय फलंदाजाने केला मोठा पराक्रम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावले वादळी शतक
Virat Kohli 27000 runs complete in international cricket
IND vs BAN : विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय

टी-२० मध्ये १०,००० धावा करणारा बटलर हा नववा क्रिकेटर ठरला –

जोस बटरलरने ८३ धावांच्या खेळीसह टी-२० क्रिकेटमध्ये १०,००० धावा पूर्ण केल्या. या फॉरमॅटमध्ये अशी कामगिरी करणारा तो जगातील नववा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने ब्रेंडन मॅक्क्युलमला मागे टाकले आहे. मॅक्युलमच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये ९९२२ धावा आहेत.

हेही वाचा – Team India: ‘…तर देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा उपयोग काय?’ अभिनव मुकुंदने बीसीसीआयच्या संघ निवडीवर उपस्थित केला सवाल

जोस बटलरने रोहित शर्मा मागे टाकले –

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०,००० धावा पूर्ण करण्यात जोस बटलरने रोहित शर्माला मागे टाकले आहे. रोहित शर्माला टी-२० मध्ये हा आकडा गाठण्यासाठी ३६२ डाव खेळावे लागले. जोस बटलरने आता त्याला मागे सोडले आहे. यासोबतच तो टी-२० मध्ये सर्वात जलद १०,००० धावा पूर्ण करणारा इंग्लंडचा पहिला क्रिकेटर बनला आहे.

टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू –

१. ख्रिस गेल – १४५६२ धावा
२. शोएब मलिक – १२५२८ धावा
३. किरॉन पोलार्ड – १२१७५ धावा
४. विराट कोहली – ११९६५ धावा
५. डेव्हिड वॉर्नर – ११६९५ धावा
६. आरोन फिंच – ११३९२ धावा
७. अॅलेक्स हेल्स – ११२१४ धावा
८. रोहित शर्मा – ११०३५ धावा
९. जोस बटलर – १००८० धावा.