Jos Buttler Resigns as England ODI Captain: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधून इंग्लंडचा संघ गट टप्प्यातूनच बाहेर पडला. इंग्लंड संघाला अफगाणिस्तानविरूद्ध मोठा लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर इंग्लंड संघाचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील आव्हान संपुष्टात आले. यासह आयसीसी स्पर्धेतील इंग्लंडची निराशाजनक कामगिरी कायम राहिल्याने इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने इंग्लंडच्या वनडे संघाचा राजीनामा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ दरम्यान मोठी बातमी आली आहे. इंग्लंडचा माजी विश्वविजेता कर्णधार जोस बटलरने राजीनामा दिला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंड संघाच्या खराब कामगिरीनंतर बटलरने हा निर्णय घेतला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडला पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले, त्यातील दुसरा पराभव अफगाणिस्तानसारख्या छोट्या संघाविरुद्ध झाला. या पराभवासह संघ स्पर्धेतून बाहेर पडला. आता चॅम्पियन्स ट्रॉफीतील शेवटच्या गट सामन्यापूर्वी बटलरने कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे.

जोस बटलरने चॅम्पियन्स ट्रॉफीतील अखेरच्या गट सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली. संघाचे कोच ब्रँडन मॅक्युलम यांच्या समवेत बटलरने उपस्थित राहत राजीनामा दिला. बटलरच्या नेतृत्त्वाखाली गेल्या १० एकदिवसीय सामन्यांपैकी ९ सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला आहे. इंग्लंडने चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताविरूद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत इंग्लिश संघाला एकतर्फी पराभव पत्करावा लागला.

बटलर ग्रुप स्टेजमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात नेतृत्व करताना दिसणार आहे. बटलरच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंडची अवस्था दयनीय झाली. २०२३ मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकातही वाईट रीतीने पराभूत झाल्याने संघाला स्पर्धेतून लवकर बाहेर पडावे लागले होते. आता सलग दुस-या आयसीसी स्पर्धेत बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने गट टप्प्यातच आला बोजा गुंडाळला. बटलरने एकूण 43 एकदिवसीय सामन्यांमध्ये इंग्लंडचे नेतृत्व केले, त्यापैकी संघाने केवळ १८ सामने जिंकले, तर २५ सामने गमावले.

तर टी-२० फॉरमॅटमध्ये, जोस बटलरच्या नेतृत्वाखाली, इंग्लंडने २०२२ मध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. २०२४ मध्ये वेस्ट इंडिजच्या भूमीवर खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकातही इंग्लंडने उपांत्य फेरी गाठली होती. मात्र, उपांत्य फेरीत इंग्लिश संघाला भारताकडून पराभवाला सामोरे जावे लागले.