Jos Buttler took a stunning one handed catch video viral: इंग्लंडच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेट संघाचा कर्णधार जोस बटलर सध्या टी-२० ब्लास्टमध्ये लँकेशायरकडून खेळत आहे. लँकेशायरने रविवारी नॉर्थम्प्टनशायर आणि लँकेशायर यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात लँकेशायरने नॉर्थम्प्टनशायरचा ६ गडी राखून पराभव केला. या सामन्यात जॉस बटलरने फलंदाजीने मोठे योगदान दिले नसले तरी त्याने आपल्या यष्टिरक्षणाने सर्वांनाच चकित केले. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जोस बटलरने हवेत झेपावत घेतला अप्रतिम झेल –

खरेतर, या सामन्यात नॉर्थम्प्टनशायरच्या फलंदाजीदरम्यान जोस बटलरने यष्टीच्या मागे एक शानदार झेल पकडला. बटलरने विरोधी संघाचा सलामीवीर रिकार्डो वास्कोनसेलोसचा अप्रतिम झेल टिपला. जोस बटलरने घेतलेला हा झेल पाहून केवळ प्रेक्षकच नाही, तर मैदानावरील प्रत्येक खेळाडू आश्चर्यचकित झाला. ज्याचा व्हिडीओ आता तुफान व्हायरल होत आहे.

Australia Beat Pakistan by 29 Runs in 7 Over Game PAK vs AUS 1dt T20I Gabba Glenn Maxwell Fiery Inning
AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Axar Patel Stunning Catch of David Miller Reminds South Africa T20 World Cup 2024 Suryakumar Yadav IND vs SA 3rd T20I Watch Video
Axar Patel Catch: अक्षर पटेलने टिपला मिलरचा ‘सूर्या दादा स्पेशल कॅच’, सीमारेषेवर हवेत झेल घेत असा फिरवला सामना ; VIDEO व्हायरल
Sanju Samson reach 39th position in ICC T20I rankings
Sanju Samson : संजू सॅमसनची आयसीसी टी-२० क्रमवारीत मोठी झेप! सलग दोन सामन्यात शतक झळकावत पटकावले ‘हे’ स्थान
Jos Buttler hit 115 meter longest six out of stadium
Jos Buttler : जोस बटलरने मारला वर्षातील सर्वात लांब षटकार, चेंडू स्टेडियमच्या बाहेर गेल्याने गोलंदाजासह चाहतेही अवाक्, VIDEO व्हायरल
Suryakumar Yadav made big mistake in India lost the second T20I against South Africa
Suryakumar Yadav : कर्णधार सूर्यकुमार यादवची ‘ती’ चूक टीम इंडियाला पडली महागात, यजमानांनी भारताच्या तोंडचा घास हिरावला
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
Sanju Samson Creates History With 2nd Consecutive T20I Century Becomes First Indian Batsman IND vs SA
Sanju Samson Century: संजू सॅमसनने शतकासह घडवला इतिहास, टी-२० इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय खेळाडू

३२ वर्षीय बटलरची चपळता पाहा –

जोस बटलरचा हा अप्रतिम झेल नॉर्थम्प्टनशायरच्या डावाच्या तिसऱ्या षटकात पाहायला मिळाला. लँकेशायरचा गोलंदाज ल्यूक वुडचा चेंडू रिकार्डो व्हॅस्कॉन्सेलॉसच्या बॅटच्या बाहेरील कडा घेऊन विकेटच्या मागे गेला. चेंडू बटलरपासून दूर होता पण ३२ वर्षीय खेळाडूने त्याच्या चपळाईने डावीकडे वेगवान डायव्ह मारली आणि चेंडू त्याच्या ग्लोव्हजमध्ये पकडला.

जोस बटलर ॲशेस मालिकेत खेळवण्याची चाहत्यांनी केली मागणी –

जोस बटलरच्या या शानदार झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर कमेंट करताना चाहत्यांनी जॉनी बेअरस्टोऐवजी बटलरला ॲशेसमध्ये खेळवावे, असे म्हटले आहे. जॉनी बेअरस्टो आतापर्यंत ॲशेसच्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला आहे. त्याच्या बॅटमधून धावा झाल्या नाहीत. एका यूजरने ‘फ्लाइंग बटलर’ असे म्हटले आहे. आणखी एका युजरने म्हटले आहे की, बटलर ॲशेस का खेळत नाही?

हेही वाचा – ENG vs AUS: रविचंद्रन अश्विनने ॲलेक्स कॅरीच्या कृतीचे केले समर्थन; म्हणाला, “खिलाडूवृत्ती यांसारख्या प्रश्नांऐवजी त्याच्या…”

जोस बटलर फलंदाजीत अपयशी –

या सामन्यात लँकेशायरने सहा गडी राखून विजय मिळवला. १३९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लँकेशायरने १७ व्या षटकातच १३९ धावांचे लक्ष्य गाठले. लँकेशायरसाठी फिल सॉल्टने ५१ चेंडूत नाबाद ७४ धावांची शानदार खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावप लँकेशायरने सामना जिंकला. फलंदाजीदरम्यान जोस बटलर फ्लॉप झाला. त्याने केवळ ११ धावांचे योगदान दिले.