Jos Buttler Half Century the Hundred 2023: ‘द हंड्रेड टूर्नामेंट २०२३’ मध्ये जो बटलरने आणखी एक शानदार खेळी खेळली. मँचेस्टर ओरिजिनल्सकडून त्याने तुफानी फलंदाजी करताना धडाकेबाज अर्धशतक झळकावले. बटलरने सलामीवीर म्हणून ५ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ६२ धावा केल्या. मॅक्स होल्डननेही चांगली कामगिरी केली. त्याने १६ चेंडूत २४ धावा केल्या. अशा प्रकारे मँचेस्टरने १३८ धावा केल्या. मात्र, या सामन्याचा निकाल लागू शकला नाही. पावसामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही.

मँचेस्टर ओरिजिनल्सचा कर्णधार जोस बटलर सोमवारी ओल्ड ट्रॅफर्ड येथे बर्मिंगहॅम फिनिक्सविरुद्ध खेळताना विचित्र पद्धतीने धावबाद झाला. त्याने डायव्ह मारून क्रीजमध्ये पोहचण्याचा प्रयत्न केला, पण शेवटच्या क्षणी त्याची बॅट जमिनीवर आदळली आणि हवेत उडाली. बेनी हॉवेलने टाकलेल्या ६७व्या चेंडूवर तो बाद झाला. बटलरने तो शॉट मिड-ऑफच्या दिशेने खेळला होता, पण मोईन अलीने जबरदस्त थ्रो केला. तो चेंडू थेट स्टंपवर जाऊन आदळला आणि बेल्स उडाल्या. त्यावेळी त्याला त्याची बॅट ग्राउंड करता आली नाही. थर्ड अंपायरने बटलरला बाद ठरवले आणि तो रागाच्या भरात तिथून ड्रेसिंगरूममध्ये निघून गेला.

Mike Tyson, YouTube Influencer, Netflix, Mike Tyson news, Mike Tyson latest news,
विश्लेषण : माजी जगज्जेता माइक टायसन यू-ट्यूब इन्फ्लुएन्सरकरडून पराभूत! लढत खरी होती की लुटुपुटूची? फायदा नेटफ्लिक्सचाच?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
Axar Patel Stunning Catch of David Miller Reminds South Africa T20 World Cup 2024 Suryakumar Yadav IND vs SA 3rd T20I Watch Video
Axar Patel Catch: अक्षर पटेलने टिपला मिलरचा ‘सूर्या दादा स्पेशल कॅच’, सीमारेषेवर हवेत झेल घेत असा फिरवला सामना ; VIDEO व्हायरल
Pat Cummins attend Coldplay concert with wife missed ODI series decider against Pakistan ahead of Border-Gavaskar Trophy Get Trolled
Pat Cummins: पॅट कमिन्स भारताविरुद्धच्या मालिकेची तयारी सोडून कोल्डप्ले कॉन्सर्टला; ऑस्ट्रेलियाच्या विश्रांती देण्याच्या निर्णयावर टीका
Virat Kohli and Yashavi Jaiswal dominated Australian newspaper front pages
Virat Kohli : ‘नव्या युगाचा मुकाबला…’, विराट-यशस्वी ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर झळकल्याने चाहत्यांचे वेधले लक्ष, PHOTOS व्हायरल
Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral :
Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’

मात्र, या सामन्यादरम्यान जोस बटलर ज्या पद्धतीने धावबाद झाला त्यावर आता क्रिकेट वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. त्याची ही विकेट वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. क्रिकेटच्या नियमानुसार हे रन आउट होऊ शकत नाही असे काही चाहत्यांचे म्हणजे आहे. काय सांगतो नियम जाणून घ्या.

हेही वाचा: IPL 2024: सनरायझर्स हैदराबादमध्ये मोठा बदल; ब्रायन लाराची हकालपट्टी, ‘हा’ स्टार अष्टपैलू खेळाडू झाला मुख्य प्रशिक्षक

मेरीलेबोन क्रिकेट क्लबच्या नियम ३८.१ नुसार

“जर फलंदाज क्रीजबाहेर असेल आणि त्याची बॅट हवेत असेल आणि कुठलाही हिस्सा हा क्रीजच्या आत नसेल तर तो बाद ठरवला जातो. बटलरच्या बाबतीत सुद्धा हेच झाले आणि नियमानुसार तो बाद आहे असे अंपायरने ठरवले.”

मँचेस्टरचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. त्याने ५ विकेट्स गमावून १३८ धावा केल्या. यादरम्यान फिलिप सॉल्ट आणि बटलर सलामीला आले. बटलरने ३६ चेंडूत ६२ धावा केल्या. त्याने ५ षटकार आणि ३ चौकार मारले. सॉल्टने ९ चेंडूंचा सामना करत २१ धावा केल्या, त्याने ३ षटकार मारले. मॅक्स होल्डनने १६ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने २४ धावा केल्या. पॉल वॉल्टर २ धावा करून बाद झाला. अॅश्टन टर्नरने १० चेंडूत नाबाद १६ धावा केल्या.

हेही वाचा: IND vs WI 3rd T20: टीम इंडियाची नाचक्की आता हार्दिक पांड्याच्या हाती, तिसरा सामना हरल्यास ओढवेल ‘ही’ नामुष्की!

विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंच्या यादीत बटलरचा समावेश आहे. त्याने १०६ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २७१३ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने एक शतक आणि २० अर्धशतके झळकावली आहेत. त्याने नाबाद १०१ धावा केल्या आहेत. बटलरने १६५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४६४७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ११ शतके आणि २४ अर्धशतके झळकावली आहेत. त्याने ५७ कसोटी सामन्यात २९०७ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने दोन शतके आणि १८ अर्धशतके केली आहेत. बटलरने इंडियन प्रीमियर लीगमध्येही चमकदार कामगिरी केली आहे. त्याने ९६ सामन्यात ३२२३ धावा केल्या आहेत. या स्पर्धेत त्याने ५ शतके आणि १९ अर्धशतके केली आहेत. या काळात बटलरची सर्वोत्तम धावसंख्या १२४ धावा आहे. त्याने आयपीएलमध्ये ३१९ चौकार आणि १४९ षटकार मारले आहेत.