सध्याची भारताची फलंदाजी ही जगातील सर्वोत्तम आहे; पण कर्णधार विराट कोहलीला बाद करण्यात यश मिळवले तर भारताची फलंदाजीही भेदता येऊ शकते, असे मत ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार आणि वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याने व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोहलीने गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिकेत चार शतकांसह ६९२ धावा फटकावल्या होत्या. कोहलीविषयी हेझलवूड म्हणाला, ‘‘६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेआधी धावांची टांकसाळ उघडणारा विराट कोहली हाच केंद्रस्थानी आहे. भारताची फलंदाजी कोहलीवर अवलंबून आहे. भारताच्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही कोहली हाच पाहुण्यांसाठी तारणहार ठरला होता. अन्य फलंदाज अपयशी ठरले होते. त्यामुळे कोहलीला बाद करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पर्याय उपलब्ध आहेत. त्याच्यासाठी आम्ही विशेष रणनीती आखली आहे.’’

‘‘सामन्याला सुरुवात होण्याआधी आम्ही कोहलीला बाद कसे करता येईल, याविषयी चर्चा नक्कीच करू. एकदा कोहलीला सूर गवसला की त्याला रोखणे कोणत्याही गोलंदाजांना अवघड जाते. पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावातच कोहलीला लवकर बाद केले, तर त्याचा फायदा आम्हाला उर्वरित कसोटी मालिकेत होईल. भारत हा कसोटीत जगातील अव्वल क्रमांकाचा संघ असला तरी मायदेशात आम्ही चांगले क्रिकेट खेळत आहोत. आमच्याकडे गोलंदाजांची चांगली फळी आहे. त्यामुळे दोघांनाही मालिका जिंकण्याची संधी आहे, असे मला वाटते,’’ असेही त्याने सांगितले.

ऑस्ट्रेलियन खेळपट्टय़ांवर चेंडूला मिळणाऱ्या ‘रिव्हर्स स्विंग’विषयी हेझलवूड म्हणाला, ‘‘अ‍ॅडलेड आणि पर्थची खेळपट्टी ही रिव्हर्स स्विंग गोलंदाजीसाठी पोषक नाही. माझ्या मते, रिव्हर्स स्विंगचा सामन्यावर फारसा फरक पडेल, असे मला वाटत नाही.’’