घरच्या मैदानावर शानदार कामगिरीसह विदर्भने हरयाणावर ७ विकेट्सनी मात केली. मोहित हुडाच्या ६५ धावांच्या खेळीच्या जोरावर हरयाणाने १३६ धावा केल्या. त्याला अन्य खेळाडूंची साथ मिळाली नाही. विदर्भतर्फे रजनीश गुरबानी आणि रवी जंगिड यांनी प्रत्येकी ३ बळी मिळाले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना हिमांशू जोशीच्या अर्धशतकाच्या बळावर विदर्भने २ विकेट्स मोबदल्यात लक्ष्य गाठले. हिमांशूने ६ चौकार आणि २ षटकारांसह ४६ चेंडूंत ६१ धावांची खेळी केली. फैझ फझलने ३७ चेंडूत ४ चौकारांसह ३७ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
हरयाणा : २० षटकांत ८ बाद १३६ (मोहित हुडा ६५, रवी जंगिड ३/१३, रजनीश गुरबानी ३/२४) पराभूत विरुद्ध विदर्भ : १९.३ षटकांत २ बाद १४० (हिमांशू जोशी नाबाद ६१, फैझ फझल ३७, युझवेंद्र चहल १/२७)गुण : विदर्भ- ४, हरयाणा-०

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा