भारताची जोश्ना चिनप्पाने सातत्यपूर्ण खेळाचा नजराणा सादर करताना ऑस्ट्रेलियन खुल्या स्क्वॉश स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर हरिंदर सिंग आणि महेश माणगावकर यांना स्पध्रेतून गाशा गुंडाळावा लागला. पहिला गेम हरल्यानंतरही सहाव्या मानांकित जोश्नाने दमदार पुनरागमन करत १२व्या मानांकित न्यूझीलंडच्या मेगान क्रेगवर ५-११, ११-६, ११-६, ११-८ असा विजय मिळवला. पुढील फेरीत तिला अव्वल मानांकित हाँगकाँगच्या अ‍ॅन्नी आउ हिच्याशी सामना करावा लागणार आहे. पुरुष एकेरीत सहाव्या मानांकित महेशला ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह फिनित्सीसकडून ११-७, ११-४, ९-११, ९-११, ७-११ असा पराभव पत्करावा लागला, तर हरिंदरला मलेशियाच्या नाफिजवान अदनानने ४-११, ११-७, ४-११, १५-१३, ९-११ असे पराभूत केले.

Story img Loader