भारताचे माजी कर्णधार ज्यूड फेलिक्स यांची भारतीय पुरुष हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य प्रशिक्षक टेरी वॉल्श यांच्या समन्वयामार्फत फेलिक्स काम पाहणार आहेत. तीन महिन्यांच्या हंगामी तत्त्वावर फेलिक्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर गुरुवारपासून सुरू होणाऱ्या भारतीय संघाच्या सराव शिबिरापासून फेलिक्स आपला पदभार स्वीकारतील. ‘‘अनेक वर्षे खेळाडू आणि प्रशिक्षणाच्या अनुभवाचा खेळाडूंना फायदा होईल, अशी आशा आहे. भारतीय संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदानाची खात्री आहे. रोलँट ओल्ट्समन्स आणि टेरी वॉल्श यासारख्या दिग्गजांसह काम करण्याची संधी मिळणार आहे, याचा आनंद मला होत आहे,’’ असे फेलिक्स यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा