मुंबई खो-खो असोसिएशन आणि ओम साईश्वर सेवा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या १४ वर्षांखालील किशोर/किशोरी (१४ वर्षांखालील) जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पध्रेत किशोर गटात ओम समर्थ संघाने आपले विजेतेपद राखले, तर किशोरी गटात शिवनेरी सेवा मंडळाला अनेक वर्षांनी जेतेपदाचा मान मिळाला. किशोर गटाच्या अंतिम सामन्यात ओम समर्थ भारत व्यायाम मंदिराने श्री समर्थ व्यायाम मंदिरचा ११-६ असा एक डाव आणि पाच गुणांनी पराभव केला. या सामन्यात ओम समर्थच्या सनी तांबे, शुभम शिगवण आणि नीरज गवस यांनी प्रेक्षणीय खेळ केला, तर समर्थकडून वरद फाटक, आराध्य कीर आणि प्रतिक होडावडेकर यांनी जोरदार लढत दिली. किशोरी गटात शिवनेरी संघाने विजय क्लबचा ५-२ असा एक डाव आणि तीन गुणांनी पराभव केला. शिवनेरीतर्फे प्रतिक्षा महाजन, सायली म्हैसधुणे आणि वैभवी अवघडे यांनी उत्तम खेळ केला, तर विजयकडून अनुश्री ठाकूर, सेजल हडकर यांनी चांगली लढत दिली. सनी तांबे (ओम तांबे) आणि सायली म्हैसधुणे (शिवनेरी) स्पध्रेतील अष्टपैलू खेळाडू ठरले. वरद फाटक (श्री समर्थ) आणि अनुश्री ठाकूर (विजय) यांना सर्वोत्तम आक्रमक ठरले, तर निरज गवस (ओम समर्थ) आणि प्रतिक्षा महाजन (शिवनेरी) सर्वोत्तम संरक्षक ठरले.
खो-खो : किशोर गटात ओम समर्थला आणि किशोरींमध्ये शिवनेरीला विजेतेपद
मुंबई खो-खो असोसिएशन आणि ओम साईश्वर सेवा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या १४ वर्षांखालील किशोर/किशोरी (१४ वर्षांखालील) जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पध्रेत किशोर गटात ओम समर्थ संघाने आपले विजेतेपद राखले, तर किशोरी गटात शिवनेरी सेवा मंडळाला अनेक वर्षांनी जेतेपदाचा मान मिळाला.
First published on: 19-12-2014 at 07:50 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Junior kho kho