Women T20 World Cup: भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचा विश्वास आहे की दक्षिण आफ्रिकेतील विश्वचषक विजयी अंडर-१९ संघाच्या यशामुळे तिच्या संघाला अतिरिक्त प्रेरणा मिळेल. येत्या १० फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी२० विश्वचषक स्पर्धेत उपयोगी पडेल. भारताच्या वरिष्ठ महिला संघाला आयसीसीचे जागतिक विजेतेपद पटकावण्यात अपयश आले आहे.
प्रथमच खेळल्या गेलेल्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत महिला अंडर-१९ संघाने इंग्लंडचा पराभव केला. हरमनप्रीतने इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलच्या स्तंभात लिहिले की, “आमच्याकडे सीनियर खेळाडू तसेच शफाली वर्मा आणि ऋचा घोष यांच्यासारखे प्रतिभावान युवा खेळाडू आहेत, जे अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाच्या विजयामुळे प्रफुल्लित झाले आहेत. या संघात त्याला आता अव्वल स्तरावर क्रिकेट खेळण्याचा पुरेसा आला अनुभव आहे.
कर्णधार म्हणाली, “आमच्याकडे फलंदाजीत खूप डेप्थ असून गोलंदाजीत विविधता आहे. वेगवान गोलंदाजीमध्ये रेणुका सिंगच्या आगमनाने धारदारपणा आला आहे. यामुळे अव्वल संघांन विरोधात खेळताना तिचा अनुभव खूप उपयोगी पडू शकतो.” भारतीय संघ विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेत तिरंगी मालिका खेळत आहे. त्यात भारत, वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका या तीन संघाचा समावेश असून भारत त्या मालिकेत अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे.
हरमनप्रीत म्हणाली, “मला खात्री आहे की दक्षिण आफ्रिकेत खेळवली जाणारी ही स्पर्धा (विश्वचषक) खूप स्पर्धात्मक असेल. ऑस्ट्रेलियाचा संघ विजयाचा प्रबळ दावेदार असेल, पण इतर संघही मागे नाहीत. यामध्ये काही उत्कंठावर्धक आणि काही शानदार सामने बघायला मिळणार आहेत. भारतीय संघाने डिसेंबरमध्ये त्यांच्याच भूमीवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची मालिका १-४ ने गमावली होती.”
हरमनप्रीत कौर पुढे म्हणाली, “आम्ही मालिका १-४ ने जरी गमावली असली पण या मालिकेदरम्यानचे वातावरण खूपच रोमांचक होते. मुंबईतील स्टेडियममध्ये हजारो प्रेक्षक आले होते.” भारतीय कर्णधार पुढे म्हणाली, “ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमुळे आम्हाला अधिक बळ मिळाले आहे. कोणत्याही बलाढ्य संघाबरोबर खेळताना तुम्ही देखील अधिक ताकदवान होता आणि तुमच्यापेक्षा कमकुवत किंवा तुमच्या ताकदीच्या संघाला सहज हरवू शकतात. आम्हाला या अनुभवाचा अधिक वापर करून त्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. मला संघातील सर्व खेळाडूंच्या क्षमतेवर विश्वास आहे. प्रत्येकाची काय ताकद आणि कमजोरी आहे हे आम्हाला समजले असून ती फक्त योग्य ठिकाणी वापरली गेली तर जगातील अव्वल संघांना पराभूत करणारा भारतीय संघ म्हणून स्मरणात राहील. त्यासाठी पद्धतशीरपणे योजना आखून आमची पातळी आणखी उंचावायची आहे.”