रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यासाठी सिंगापूरचा अष्टपैलू क्रिकेटपटू टीम डेव्हिडसह श्रीलंकेच्या वनिंदू हसरंगा आणि दुश्मंता चमीरा यांचा समावेश केला आहे. आरसीबीने त्यांच्या ट्विटरवर याची घोषणा केली. ऑस्ट्रेलियाचा अॅडम झम्पा, केन रिचर्डसन आणि न्यूझीलंडचा फिन अॅलन आणि स्कॉट कुगलाइन आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात उपलब्ध होणार नाहीत. आयपीएल २०२१ पुढे ढकलण्यापूर्वी झम्पा आणि रिचर्डसन यांनी वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली.

हसरंगा आणि चमीरा यांनी भारताविरुद्ध नुकत्याच झालेल्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत दमदार कामगिरी केली. तर डेव्हिडने बिग बॅश लीगसह जगातील इतर अनेक मोठ्या टी-२० लीगमध्ये भाग घेतला आहे.

 

 

 

 

हेही वाचा – ‘‘मी सचिनपेक्षा सेहवागला घाबरायचो..”, जगातल्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजानं दिली प्रतिक्रिया

सायमन कटिचचा राजीनामा

या व्यतिरिक्त, सायमन कटिचने वैयक्तिक कारणामुळे मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. त्याच्या जागी आता माइक हेसन ही जबाबदारी स्वीकारतील. ते आरसीबीचे क्रिकेट संचालक देखील आहेत.

एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात आरसीबीने चमकदार कामगिरी केली होती. आरसीबीचा संघ सात सामन्यांत पाच विजयांसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Story img Loader