Virat Kohli last Test series in Australia says Justin Langer : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २२ नोव्हेंबरपासून पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामन्या पर्थ येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी भारतीय संघाचे आणि खेळाडूंचे कौतुक केले. जस्टिन लँगर म्हणाले, टीम इंडिया एक चॅम्पियन संघ आहे आणि त्यांना कमी लेखू नये. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या चार कसोटी मालिका जिंकल्या आहेत, त्यापैकी दोन ऑस्ट्रेलियात खेळल्या गेल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जस्टिन लँगरचे विराटसाठी ऑस्ट्रेलियन जनतेला आव्हान –

जस्टिन लँगरने असेही म्हटले आहे की, कदाचित ही विराट कोहलीची ऑस्ट्रेलियातील शेवटची कसोटी मालिका असेल, त्यामुळे येथील लोकांनी याचा आनंद घ्यावा. तसेच रोहित शर्मा आणि अश्विनसारख्या खेळाडूंसाठी ही ऑस्ट्रेलियातील शेवटची कसोटी मालिका असेल. ‘द वेस्ट ऑस्ट्रेलियन’शी बोलताना जस्टिन लँगर यांनी सांगितले की, “जर विराट कोहली ऑस्ट्रेलियात खेळण्याची ही शेवटची वेळ असेल, तर लोकांनी त्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थितीत रहावे, कारण तो सुपरस्टार आहे. रोहित शर्मा, अश्विन, जडेजा आणि बुमराह हे देखील सुपरस्टार आहेत. ते पुन्हा येथे खेळताना दिसणार नाहीत. त्यामुळे तुम्ही या संधीचा आनंद घ्या.” कारण विराटसह भारताचे इतर दिग्गज डब्ल्यूटीसी फायनलनंतर कसोटीतून निवृत्ती घेऊ शकतात.

जस्टिन लँगरकडून टीम इंडियाचे कौतुक –

लँगर पुढे टीम इंडियाचे कौतुक करताना म्हणाले, “एक गोष्ट तुम्ही कधीही करु नये, ती म्हणजे चॅम्पियन्सना कमी लेखू नये, आणि हे प्रत्येक खेळात घडते. कारण ते कोणत्या तरी कारणाने चॅम्पियन असतात. भारतात दीड अब्ज क्रिकेट चाहते आहेत. त्यांना उत्कृष्टतेशिवाय काहीही नको आहे.” २०२०-२१ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियात दुसऱ्यांदा कसोटी मालिका जिंकली, तेव्हा जस्टिन लँगर म्हणाले होते की, या भारतीय संघाला कधीही कमी लेखू नका.

हेही वाचा – Babar Azam : ‘तू कॅच सोड अन्…दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवं’, ऑस्ट्रेलियात बाबर आझमची चाहत्यांनी उडवली खिल्ली, VIDEO व्हायरल

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना पर्थमध्ये होणार आहे. यानंतर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील पिंक बॉल कसोटी सामना ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. यानंतर दोन्ही संघ गाबाकडे रवाना होतील. ही मालिका सुमारे ५० दिवस चालणार असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संपेल. याआधी बॉक्सिंग डे कसोटी सामनाही खेळवला जाणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Justin langer says if this is the last time virat kohli is out here in australia people enjoy it because he is superstar ahead bgt vbm