चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ताने, अभिनेते नाना पाटेकरांविरोधात असभ्य वर्तन केल्याची तक्रार केल्यानंतर सध्या सोशल मीडियावर अनेक स्तरांमधून लैंगिक छळ आणि असभ्य वर्तनाच्या बाबी समोर येत आहेत. अनेक क्षेत्रातील मान्यवर स्त्रिया ट्विटरव व अन्य सोशल मीडियावर #MeToo या सदराखाली आपले अनुभव मांडत आहेत. यामध्ये भारताची माजी बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिचाही समावेश झाला आहे. भारतासाठी खेळत असताना आपल्यालाही अशाच प्रकारे मानसिक छळाला सामोरं जावं लागल्याची कबुली ज्वालाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वात प्रथम ज्वालाने आपणही आपल्याला सोसाव्या लागलेल्या मानसिक छळाबद्दल बोलावं का असं ट्विट केलं, ज्यावर तिच्या चाहत्यांनी सकारात्मक प्रतिसाद नोंदवला.

यानंतर ज्वाला गुट्टाने भारतासाठी खेळत असताना आपल्याला जाणूनबुजून संघाबाहेर ठेवण्यात आल्याचं म्हटलं. राष्ट्रीय स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करुनही संघटनेचा प्रमुख असलेल्या व्यक्तीने आपल्या सहकाऱ्यांना धमकावत त्रास द्यायला सुरुवात केली. मला एकटं पाडण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले गेले, ज्यामुळे अखेर मी निवृत्ती स्विकारण पसंत केलं, मात्र आपल्या ट्विटमध्ये ज्वालाने कोणत्याही व्यक्तीचं नाव घेतलं नाहीये. मध्यंतरी ज्वाला गुट्टा आणि प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्यात वाद झाले होते, मात्र या प्रकरणात ज्वालाला नेमका कोणाकडे अंगुलीनिर्देश करायचा आहे हे स्पष्ट झालेलं नाहीये. गोपीचंद यांनी या प्रकरणी प्रतिक्रीया देण्यास नकार दिला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jwala gutta shares her metoo story of mental harassment
Show comments