K. Shrikant on Shardul Thakur: BCCIने विश्वचषक २०२३साठी मंगळवारी भारतीय संघ जाहीर केला आहे. ज्यामध्ये अष्टपैलू शार्दुल ठाकूरला आठव्या क्रमांकावर फलंदाजाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शार्दुलच्या अष्टपैलू कामगिरीने दोन दिग्गजांमध्ये वादाची ठिणगी पडली. बीसीसीआयचे माजी मुख्य निवडकर्ता कृष्णमाचारी श्रीकांत यांनी शार्दुलच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून संजय बांगरही मैदानात उतरले. माजी क्रिकेटपटू के. श्रीकांत यांनी त्याच्या निवडीवर जोरदार टीका केली आहे.
स्टार स्पोर्ट्सच्या तज्ञ पॅनेलमध्ये दोघांमधील वादात श्रीकांत म्हणाले की, “शार्दुलने अद्याप आपली अष्टपैलू शैली सिद्ध केलेली नाही.” खालच्या फळीत फलंदाजीबरोबरच श्रीकांत आणि संजय बांगर यांनी त्याच्या वेगवान गोलंदाजीचीही चर्चा केली. श्रीकांत यांच्यामते, शार्दुलऐवजी भारत आठव्या स्थानासाठी स्पेशलिस्ट फिरकीपटू किंवा वेगवान गोलंदाज निवडू शकला असता.
“शार्दुल ठाकूरचा संघात समावेश करून भारतीय संघाने खूप मोठी चूक केली आहे,” असे माजी क्रिकेटपटू एस. तो फलंदाजी किंवा गोलंदाजी करत नाही. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना एस. श्रीकांत म्हणाले, “प्रत्येकजण म्हणत आहे की आम्हाला आठव्या क्रमांकावर फलंदाज हवा आहे. आठव्या क्रमांकावर फलंदाज कोणाला हवा आहे? शार्दुल ठाकूर केवळ १० धावा करत आहे. तो काय अष्टपैलू खेळाडू आहे असे मला वाटत नाही. तो धड फलंदाजी करू शकत नाही. तो धड १० षटकेही नीट गोलंदाजी करत नाही, त्याच्याकडून फलंदाजीची काय अपेक्षा करता? त्याला संघात संधी देणं म्हणजे मूर्खपणाचे लक्षण आहे. तुम्ही नेपाळ विरुद्धचा सामना पाहा, त्याने किती षटके टाकली? फक्त ४. झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्धची त्याची कामगिरी बघू नका.”
एस. श्रीकांत पुढे म्हणाले, “जर तो परफॉर्म करत असेल तर तुम्ही त्याला तुमच्या यादीत ठेवा, नाहीतर त्याला इतकं महत्त्व देऊ नये. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या संघांविरुद्ध त्यांची कामगिरी तुम्ही पाहा. म्हणूनच मी म्हणतो की एकूण त्याच्या सरासरीने फसवू शकत नाही, तुम्ही त्याचे प्रत्येक सामने बघा.” जर शार्दुल ठाकूरच्या शेवटच्या १० डावांबद्दल बोलायचे तर त्याने एकूण ५१ धावा केल्या. शेवटच्या १० एकदिवसीयमध्ये त्याला एकूण ६ डावात फलंदाजीची संधी मिळाली आहे. शार्दुलची सर्वोच्च धावसंख्या २५ होती. जर त्याच्या विकेट्सबद्दल बोलायचे झाले तर त्याने एकूण १८ विकेट्स घेतल्या आहेत. नुकतेच त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध ४ विकेट्स घेतल्या होत्या.
संघाची घोषणा करताना, कर्णधार रोहित शर्मा पत्रकार परिषदेत म्हणाला होता की, “आधुनिक क्रिकेटच्या मागण्या अशा आहेत की ११ क्रमांकावरही फरक पाडू शकतो असा खेळाडू पाहिजे असतो. त्यामुळे त्याला धावा करता आल्या पाहिजेत. आम्हाला फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये सखोलता निर्माण करण्याची गरज आहे.” आशिया चषकानंतर ५ ऑक्टोबरपासून भारताकडे विश्वचषक स्पर्धा होणार आहे.