‘राहुल.. राहुल..’ हा नाद राजीव गांधी क्रीडा संकुलात अविरत घुमत होता. त्याच्या प्रत्येक चढाईला प्रेक्षक मनमुराद दाद देत होते. तोही रसिकांच्या या टाळ्यांना न्याय देत आपली अदाकारी सादर करीत होता. हे चित्र स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी लीगच्या विशाखापट्टणम्मधील प्रत्येक सामन्यात दिसून येत होते. तेलुगू टायटन्सचा संघनायक राहुल चौधरी आता देशविदेशातील कबड्डीशौकिनांच्या हृदयसिंहासनावर राज्य करू लागला आहे. ‘कबड्डीच्या क्षितिजावरील एकतारा म्हणजे राहुल चौधरी’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
राहुलचे वडील रामपाल सिंग पोलीस दलात होते. कबड्डी खेळात हातपाय मोडतील, त्यामुळे हा खेळ खेळू नको, असा सल्ला रामपाल यांनी राहुलला दिला होता. परंतु त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या राहुलला बऱ्याचदा मार खावा लागला होता. मात्र आता राहुलला कबड्डी खेळामुळे लोकप्रियता मिळते आहे. याविषयी आई-वडिलांना कसे वाटते आहे, हे सांगताना राहुल क्षणभर भावुक झाला. तो म्हणाला, ‘‘मागील हंगामात माझे आई-वडील दिल्लीला आले होते. दबंग दिल्लीविरुद्ध आमचा रोमहर्षक सामना अनिर्णीत राहिला. तो सामना पाहून ते धन्य झाले. दुखापती होणार नाही याची काळजी घे आणि डोके वापरून खेळ, असा सल्ला त्यांनी दिला.
प्रो कबड्डीच्या व्यासपीठावर सर्वोत्तम चढाईपटू म्हणून गणला जाणारा राहुल हा आधी उजवा कोपरारक्षक होता. परंतु जसा क्रिकेट हा फलंदाजाचा खेळ असतो, तसेच कबड्डीमध्ये क्षेत्ररक्षकाला काहीही महत्त्व नसते, हे लक्षात आल्यामुळे त्याने चांगला चढाईपटू होण्याकडे लक्ष केंद्रित केले. प्रो कबड्डीच्या पहिल्याच हंगामात तो सर्वोत्तम चढाईपटू ठरला. २०१४च्या आशियाई क्रीडा स्पध्रेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली होती. परंतु पासपोर्टच्या समस्येमुळे तो भारताचे प्रतिनिधित्व करू शकला नव्हता. मात्र त्याच वर्षी फुकेटला झालेल्या आशियाई समुद्रकिनारी स्पध्रेत त्याने भारताचे नेतृत्व केले होते. २०१८च्या आशियाई क्रीडा स्पध्रेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न त्याने जोपासले आहे. कबड्डी खेळलो नसतो तर सेनादलात सामील होऊन देशाची सेवा केली असती, असे तो आत्मविश्वासाने सांगतो.

राहुल चौधरी
* जन्मदिनांक : १६ जून १९९३
* वजन : ८० किलो
* उंची : १८२ सेंटीमीटर
* दिनक्रम : सकाळी ५ वाजता उठल्यानंतर धावण्याचा सराव आणि अन्य शारीरिक कसरती. मग वडिलांसोबत शेतात काम करणे. मोकळ्या वेळात टीव्ही पाहणे. दुपारी एक तास आराम करणे. सायंकाळी खेळाचा सराव आणि रात्रीच्या भोजनानंतर ९ वाजता झोपणे.
* कौशल्य विकास : कौशल्याचा विकास करण्यासाठी झालेल्या सामन्यांचे चित्रण पाहतो. त्यातून चुकांचा अभ्यास करतो. अंजू चौधरी या प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन घेतो.
* वजनाचे नियंत्रण : वजनाच्या नियंत्रणासाठी सारे श्रम स्वत:लाच घ्यावे लागतात. आहार लक्षपूर्वक घ्यावा लागतो. वजन कमी करणारे व्यायाम प्रकार करावे लागतात. तेलकट पदार्थ कटाक्षाने टाळण्याचे भान कबड्डीच्या दौऱ्यांवरसुद्धा पाळावे लागते. ज्यूस, दोन चपात्या आणि भाजी हाच प्रमुख आहार असतो.
* चेहरा आणि केशरचना : चेहरा आणि केशरचना याकडे वैयक्तिक लक्ष कधीच दिले नव्हते. साधेपणानेच राहणे मी पसंत करायचो. परंतु प्रो कबड्डीत खेळायला लागल्यापासून आकर्षक केशरचनेकडे प्रत्येक हंगामात लक्ष देतो.
* महत्त्वाकांक्षा : कबड्डीमधील सर्वात प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार पटकावणे.
* आवडता कबड्डीपटू : संजीव वालिया.

Rahul Gandhi Amravati
“पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय, ते आजकाल…”; अमरावतीतल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल!
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
vinoba bhave, vinoba bhave life, vinoba bhave work,
ज्ञानयोगी विनोबांचे स्मरण
sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
udayanraje bhosale attack rahul gandhi while talking to media
सातारा: राहुल गांधी यांच्याकडून शिवाजी महाराजांची बदनामी; उदयनराजे यांचा हल्लाबोल
NCP Ajit Pawar group
Nawab Malik : “आम्ही किंगमेकर राहणार, आमच्याशिवाय कोणतंही सरकार…”, अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान
readers feedback on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : आगलाव्या भाषणावर आयोग गप्प राहील…
Loksatta vyaktivedh Dairy personality Ravindra Pandurang Apte former president of Gokul passed away
व्यक्तिवेध: रवींद्र आपटे