चौथी कबड्डी विश्वचषक स्पर्धा (पुरुष आणि महिला) ९ ते २३ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा भटिंडाममध्ये रंगणार असून अंतिम फेरीची लढत लुधियानामधील गुरुनानक स्टेडियममध्ये होणार आहे.
साखळी गटाचे सामने १३ स्टेडियम्सवर होतील. होशियारपूर आउटडोअर स्टेडियम, गुरुनानक स्टेडियम (अमृतसर), स्पोर्ट्स स्टेडियम (दोडा), वार हिरोज स्टेडियम (संग्रूर), नेहरू स्टेडियम (रोपर), स्पोर्ट्स स्टेडियम (चोहला साहिब), स्पोर्ट्स स्टेडियम (जलालाबाद), गव्हर्नमेंट विद्यापीठ (गुरदासपूर), एनएम गव्हर्नमेंट विद्यापीठ (मानसा) या ठिकाणी हे सामने होतील.
महिला गटातील विजेत्यासाठी देण्यात येणाऱ्या रकमेत दुपटीने वाढ करण्यात आली असून विजेता संघ एक कोटी रुपयांचा मानकरी ठरेल. उपविजेत्या संघाला ५१ लाख तर तिसऱ्या क्रमांकाच्या संघाला २५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. पुरुष गटातील विजेत्यांना दोन कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. उपविजेता संघ एक कोटी आणि तिसऱ्या क्रमांकाचा संघ ५१ लाख रुपयांचा मानकरी ठरेल. पुरुषांमधील प्रत्येकी सहभागी संघाला १५ लाख रुपये देण्यात येतील.
विश्वचषक कबड्डी स्पर्धेसाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याविषयी पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल म्हणाले, ‘‘उद्घाटन आणि समारोप सोहळ्याचे थेट प्रक्षेपण भारत, कॅनडा, अमेरिका आणि ब्रिटन या देशांमध्ये केले जाणार आहे. प्रत्येक खेळाडूला राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संस्थेच्या (नाडा) चाचणीला सामोरे जावे लागेल. त्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. छ’
कबड्डी विश्वचषकातील सहभागी संघ
पुरुष : भारत, अर्जेटिना, ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, पाकिस्तान, सिएरा लिओन, इराण, स्कॉटलंड, केनिया, डेन्मार्क.
महिला : भारत, अमेरिका, ब्रिटन, तुर्कमेनिस्तान, डेन्मार्क, केनिया.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा