वाल्हे, मुंबई येथे झालेल्या पॉवर लिफ्टिंग राज्यस्तरीय स्पर्धेत कादंबरी बाळासाहेब राऊतने सबज्युनिअर गटातील ‘स्कॉट’ प्रकारात १९७.५ किलो वजन उचलून नॅशनल रेकॉर्ड करत, सुवर्णपदक पटकाविलं. तसेच पंजाब येते १६ जून रोजी होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य, सब ज्युनियर, ज्युनियर, मास्टर पुरूष, व महिला पावर लिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, उपरोक्त स्पर्धा, भोईवाडा, मुंबई येते १ व २ जून रोजी पार पडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या स्पर्धेत, मुळ गाव वीर (ता.पुरंदर) येथील रहिवासी असलेल्या, व सध्या, हडपसर येथे स्थायिक झालेल्या, कादंबरी बाळासाहेब राऊत यांनी १९७. ५ किलो वजन उचलून, एक नवीन विक्रम केला असून, पातियाळा (पंजाब) येथे दि.१६ जून पासून, सुरू होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी तिची निवड झाली असल्याची तिचे प्रशिक्षक पी. बाकीराज यांनी सांगितले. तिच्या यशाबद्दल, कादंबरी राऊत हिचे वडील, उद्योजक बाळासाहेब राऊत, सासवड नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका मंगल म्हेञे, उद्योजक प्रितम म्हेत्रे आदींसह, हडपसर, व पुरंदर तालुक्यातील अनेकांनी राऊत यांचे अभिनंदन केले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kadambari raut wins gold medal in state level power lifting competition scj