पुढील महिन्यात इटली आणि रशियाविरुद्ध होणाऱ्या मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी ब्राझील संघात स्टार फुटबॉलपटू काका याने पुनरागमन केले आहे. रोनाल्डिनो याला मात्र संघात स्थान मिळवता आलेले नाही. प्रशिक्षक लुईझ फिलिप स्कोलारी यांनी या वर्षी निवडलेल्या संघातून काका याला डच्चू मिळाला होता, पण रिअल माद्रिदच्या या अव्वल खेळाडूने ब्राझील संघातील आपले स्थान पक्के केले. स्कोलारी यांनी नेयमार, ऑस्कर आणि लुकास या युवा फुटबॉलपटूंना संघात कायम ठेवले असून गोलरक्षक ज्युलियो सेसार, दिएगो कोस्टा या अव्वल खेळाडूंवरही विश्वास दाखवला आहे. ब्राझीलचा इटलीविरुद्धचा सामना २१ मार्च रोजी जिनिव्हा येथे, तर रशियाविरुद्धचा सामना २५ मार्च रोजी लंडनमध्ये होणार आहे.
ब्राझील संघ : गोलरक्षक- ज्युलियो सेसार, दिएगो काव्हालिएरी. बचावपटू- डॅनियल आल्वेस, मार्सेलो, फिलिप लुईस, डेव्हिड लुईझ, डेडे, डान्टे, थियागो सिल्वा. मधली फळी- पॉलिन्हो, रामिरेस, जीन, फर्नाडो, लुईझ गुस्ताव्हो, काका, हर्नानेस, ऑस्कर, लुकास. आघाडीवीर- दिएगो कोस्टा, नेयमार, फ्रेड, हल्क.

Story img Loader